ETV Bharat / state

तीन मुलांचा खून करून आईची आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड

पिंपरी-चिंचवडमध्ये आईने तीन मुलांचा खून करून गळफास घेतल्याची घटना रविवारी घडली. यातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका नातेवाईकाला अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jul 29, 2019, 9:18 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये आईने ३ मुलांचा खून करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (28 जुलै) घडली होती. या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. मृतांमधील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेत एका संशयित नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, मृत आईवर मुलांचा खून केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी दिली.

सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव

तीन मुलांचा खून करून आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी भोसरीमध्ये घडली होती. मृत महिलेचे वय २८ वर्षे आहे तर, एका मुलीचे वय ७ आणि दुसऱ्या मुलीचे वय ९ वर्ष होते. आई, पीडित मुली आणि एक मुलगा हे घरीच होते. रविवारी मृत महिलेचा पती सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडला. यानंतर आईने मुलांना गळफास लावून खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही घटना पती घरी आल्यानंतर उघडकीस आली. दरम्यान, मुलांचा खून कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. मुलींवर लैंगिक अत्याचार कोणी केले हे समोर आलेले नाही.या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे करत आहेत.

Intro:mh_pun_01_suicide_update_avb_10002Body:mh_pun_01_suicide_update_avb_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये आई ने तीन मुलांचा खून करून गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत असून मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटने प्रकरणी संशयित नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मयत आईवर मुलांचा खून केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी भोसरी येथे तीन मुलांचा खून करून आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली होती. मयत २८ वर्षीय आई, ७, ९ वर्षीय पीडित मुली आणि एक मुलगा हे घरीच होते. पती सकाळी घराच्या बाहेर निघून गेला त्यानंतर आईने मुलांना गळफास देऊन खून केला तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पती घरी आल्यानंतर उघडकीस आली. पत्नीने आतून कडी लावून तीन मुलांचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, मुलांचा खून कोणी केलाय हे स्पष्ट झालेले नसून संशयावरून मयत आईवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जवळच्या नातेवाईकांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा तपास भोसरी पोलीस करत आहेत. पीडितमुलींच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याच देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नेमकं मुलांचा खून आणि मुलींवर लैंगिक अत्याचार कोणी केलाय हे अस्पष्ट असून येणाऱ्या काही दिवसात ते स्पष्ट होणार आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे करत आहेत.

बाईट:- राम जाधव- सहाय्यक पोलीस आयुक्त Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.