ETV Bharat / state

दौंड तालुक्यात एकाच गावात आढळले कोरोनाचे ८ पॉझिटिव्ह रुग्ण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन - दौंड तालुका कोरोना अपडेट

पाटस गावातील नागेश्वर विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये रुग्ण संख्या कमी होऊन ६ इतकी कमी झाल्याची माहिती आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली आहे. मात्र, यानंतर गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Nov 16, 2020, 8:07 PM IST

दौंड (पुणे)- दौंड तालुक्यातील बेटवाडी गावात कोरोनाचे आज ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना पाटस येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली आहे. पाटस येथील कोविड सेंटरमध्ये सध्या एकूण २१ रुग्ण उपचार घेत आहेत. दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढत आहे का? अस यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणुने जगभरात जनजीवन विस्कळीत केले होते. सर्वत्र टाळेबंदीची परिस्थिती होती. कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असताना सरकारने अर्थव्यवस्थेसाठी टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणा, सरकार आणि नागरीक यांनी एकत्रितरित्या केलेल्या कार्यामुळे काही दिवस कोरोनाची लाट थांबली असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत पहायला मिळाले होते. कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी झाली होती.

पाटस गावातील नागेश्वर विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये रुग्ण संख्या कमी होऊन ६ इतकी कमी झाल्याची माहिती आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली आहे. मात्र, यानंतर गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पाटस येथील कोविड सेंटरमध्ये २१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करणे गरजेचे-
दौंड तालुक्यातील बेटवाडी गावातील एकूण १५ रुग्ण पाटस येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. एकाच गावात जास्त संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने दौंडच्या ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दी टाळणे व मास्क घालणे अशा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी केले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याने सारसबाग अनिश्चित काळासाठी बंद-
कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याने, सारसबाग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. तसेच शहरात ज्या उद्यानांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या उद्यानामध्ये नियमांचे पालन न झाल्यास, ते देखील बंद करण्यात येतील, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.