पुणे - पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (गुरुवारी) कोरोनामुळे आणखी 10 जणांचा बळी गेला असून, 318 नवीन रुग्ण आढळले. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 293 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे 5 हजार 881 रुग्ण झाले असून, आज 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील 150 रुग्ण गंभीर असून यातील 49 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 5 हजार 881 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 3 हजार 264 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बऱ्या झालेल्या 205 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 2 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 293 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाच हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत चाललीय. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.
पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 318 नवीन रुग्ण, तर 10 जणांचा बळी - deepak mhaisekar
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 5 हजार 881 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बरे झालेल्या 3 हजार 264 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 205 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.