ETV Bharat / state

Maval Sarpanch Murder: मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाचा भर चौकात खून, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू - आरोपींचा शोध सुरू

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. त्यांचा भर चौकात निर्घृण खून केल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.

Sarpanch murder
सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे
author img

By

Published : Apr 2, 2023, 10:17 AM IST

Updated : Apr 2, 2023, 2:18 PM IST

मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाचा भर चौकात खून

पुणे : सरपंचाचा भर चौकात खून झाल्यामुळे मावळ तालुका हादरला आहे. जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे. प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७) असे खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे. प्रवीण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असून ते शिरगाव येथे विद्यमान सरपंच म्हणून नुकतेच निवडून आले आहे.

आरोपींचा शोध सुरू : चांगल्या मतधिक्याने ते विजयी झाले होते. प्रवीण गोपाळे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून शिरगाव चौकात कामानिमित्त आले होते. तेव्हा अचानक त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला. कोयत्याने वार देखील केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. हल्ला केल्यानंतर मारेकरी घटनास्थळवरून फरार झाले आहेत. पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

कोयत्याने वार केले : गोपाळे यांचा प्लाॅटिंगचा व्यवसाय होता. या वादातूनच वाद असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रवीण गोपाळे शनिवारी रात्री दुचाकीवरून शिरगाव येथील साई मंदिरासमोर आले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला. नागरिकांनी आरडाओरडा केला. तसेच सर्वजण सैरावैरा पळू लागले. कोयत्याचे वार चुकविण्यासाठी गोपाळे जीव वाचवण्यासाठी पळत होते.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख : त्यावेळी मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गोपाळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी दुचाकीवरून पळून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. थेट चौकात लोकप्रतिनिधीचा खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा : Accused Arrested In Murder Case Jalna : जालन्यात माजी सरपंचाची गोळ्या घालून हत्या करणारा आरोपी जेरबंद

Last Updated : Apr 2, 2023, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.