ETV Bharat / state

Sharad Pawar on Baramati Visit : बारामती दौऱ्यात शरद पवारांनी घेतल्या जुन्या मित्रांच्या गाठीभेठी ; पवारांच्या प्रश्नांनी भारावले सवंगडी - शरद पवारांनी घेतल्या जुन्या मित्रांच्या गाठीभेठी

शरद पवारांचा (NCP President Sharad Pawar) बारामती दौरा सुरू आहे. त्यांनी बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे आपल्या जुन्या मित्रांच्या गाठीभेटी (Sharad Pawar on Baramati Visit) घेतल्या. त्यांची विचारपूस केली. त्यांच्या या प्रश्नांनी मित्रपरिवार भारावून (friend at Someshwar Nagar) गेला.

NCP President Sharad Pawar
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Jan 7, 2023, 9:50 AM IST

पुणे : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) सध्या बारामती दौऱ्यावर (Sharad Pawar on Baramati Visit) आहेत. त्यांनी बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे त्यांनी आपल्या जुन्या मित्रांसोबत वेळ घालवला. त्यातील एकाच्या घरी भेट देत त्यांनी विचारपूस केली. बी. जी आता वय किती ? दादा जुना वाडा सोडून बंगल्यात केव्हा आलात ? आण्णा कामगार संघटनेचे काम अजून सुरू आहे का ? आपले जुने मित्र शरद पवार यांच्या या प्रश्नांनी ते भारावून गेले.

जुन्या मित्रांची विचारपूस : बी. जी. आता वय किती आहे ? त्यावर त्यांचे मित्र म्हणाले, साहेब ८६ वर्ष आहे. यावर माझ्यापेक्षा ४ वर्षाने जास्त आहे, असे शरद पवार म्हणाले. आता आपल्या वयाची किती शिल्लक आहेत. यावर तर तीन असे उत्तर येते. यावरून एकच हशा पिकला होता. १९६७ सालातील खासदार पवार यांच्या खांद्याला खांदा देऊन साथ देणारे निंबुतचे बी. जी. काकडे, वानेवाडीचे रघुनाथ भोसले व तुकाराम जगताप यांची शुक्रवारी खासदार पवार यांनी आवर्जून भेट घेत तब्बेतीची विचारपूस (friend at Someshwar Nagar) केली.

सैन्यदलात मुली भरती : त्यानंतर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी साधताना सांगितले की, माझ्या संरक्षणमंत्री पदाच्या काळात मुली सैन्यदलात नव्हत्या. सैन्यदलात मुली भरती व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज मुली सियाचीनसारख्या भागात देशाचे रक्षण करत आहेत. महिलांच्या हाती कारभार दिल्यास देश पुढे जाण्यास वेळ लागणार नसल्याची प्रशंसा पवार यांनी (Baramati Visit meet old friend) केली.

नोकऱ्या व कारखानदारी : कोणत्याही देशात सरसकट नोकरी मिळत नाही. आपल्या देशातील ६५ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. देश प्रगतीसाठी सर्वच क्षेत्रात नोकऱ्या व कारखानदारी उभारली पाहिजे. विकासाची सुत्रे राज्यकर्त्यांनी निर्माण केली पाहिजेत, अशी अपेक्षाही व्यक्त करत पवार यांनी समाज हळूहळू सर्व स्वीकारतो असे मत व्यक्त (Sharad Pawar meet old friend) केले.

विधानसभेत कायदा : राज्याचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर सातबाऱ्यावर महिलांची नावे लावण्यासाठी विधानसभेत कायदा करण्यात आला. त्यावेळी मोठा विरोध झाला. मात्र महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना समजावून सांगत तो कायदा पास करून घेतल्याची आठवण पवार यांनी यावेळी (Sharad Pawar meet old friend at Someshwar Nagar) सांगितली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.