ETV Bharat / state

NCP Political Crisis: Intro: पुण्यात शरद पवार यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी; तर जे गेलेत ते परत येणार- प्राजक्त तनपुरेंचा विश्वास - Poster in support of Sharad Pawar

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी शिंदे भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. राष्ट्रवादीच्या अनेक समर्थकांनी पुण्यामध्ये शरद पवार यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी केली आहे, त्यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स लावले आहे.

NCP Political Crisis
अजित पवार
author img

By

Published : Jul 3, 2023, 1:51 PM IST

राष्ट्रवादी समर्थकांची पुण्यात पोस्टरबाजी

पुणे : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचे यावेळी पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स : आता पक्षात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र पाहायला मिळत आहे. काही आमदार अजित पवार यांच्या मागे आहे, तर काही आमदार हे शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अश्यातच पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आम्ही शेवटपर्यंत शरद पवार साहेबांच्या सोबत असल्याचे फ्लेक्स लावले आहे. 'वाट आहे संघांची... म्हणून थांबणार कोण ? सह्याद्री सोबत आहे... महाराष्ट्र सारा, दऱ्या खोऱ्यातून अन्...गाव शिवारातून वाहणारा वारा...मग संघर्षाला घाबरतय कोण ?.... लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच....मी शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांच्या सोबत' अश्या आशयाचे फ्लेक्स पुण्यातील कोथरूड परिसरात गिरीश गुरनानी आणि समीर ऊत्तरकर यांनी लावले आहे.

विठ्ठलाला सोडून अजित पवारांसोबत : शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानीपिंपरी चिंचवड येथील माजी आमदार विलास लांडे, नाना काटे, संजोग वाघीरे, यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यांनी सांगितले होते की, आषाढी एकादशी झाल्याने आम्ही आमच्या विठ्ठलाची भेट घ्यायला आलो आहे. पण दुपारीच अजित पवार यांनी बंड केल्यावर ते विठ्ठलाला सोडून अजित पवार यांच्यासोबत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्राजक्त तनपुरे यांची भूमिका : अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचे यावेळी पवार म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदारांनी पाठिंबा दिला असल्याचे सांगितले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, आज जी मुंबईत बैठक झाली त्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. नंतर जी काही नाट्यमय घटना घडली त्यानंतर मी पवार साहेबांची भेट घ्यायला आलो आहे.

2019 ची पुनरावृत्ती होणार : 2019 मध्ये पवार सहेबांच्याच करिष्म्याने आमच्या बहुतांश आमदारांचा विजय झाला होता. मी आत्ता इथे येऊन साहेबांचे दर्शन घेतले. त्यांच्याच सोबत असल्याचे सांगितल आहे. यावेळी तनपुरे म्हणाले की जे गेले, त्यांचे दुःख आम्हाला देखील आहे. आम्हाला देखील वेदना झाल्या आहे. पण गेलेल्यांपैकी काहीजण आमच्या संपर्कात आहे. निश्चित ते परत येतील.आणि जे 2019 ला झाले तेच परत होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. NCP Political Crisis Update : मुदतीत न परतणाऱ्या आमदारांवर कारवाई करू-जयंत पाटील यांचा इशारा
  2. Nana Patole on NCP Crisis : महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे - नाना पटोले
  3. Maharashtra Political Crisis: अजित पवार आणि इतर 8 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या राष्ट्रवादीच्या याचिकेवर योग्य ती कारवाई करू- राहुल नार्वेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.