पुणे : पुणे व सोलापूरमधील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी राजीनाम्याचा पावित्र्यात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी गोष्ट मंगळवारी शरद पवार यांनी जाहीर केली. राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या दुसऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना, शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये आता कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. राज्यस्तरावरील सगळे कार्यकर्ते या कार्यक्रमाला असल्यामुळे तिथे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. सर्वांनी अशी मागणी केली आहे की, त्यांनी ही आपली भूमिका मागे घेऊन पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे.
निर्णय मागे घ्या : पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन, आंदोलन केले आहे. महिला असो पुरुष, तरुण, या सर्वांसाठी राजकीय पर्याय शरद पवार आहेत. शरद पवार केवळ महाराष्ट्राची नाही, तर देशाची गरज आहे. त्यासाठी आम्हाला शरद पवार साहेबांना विनंती करायची आहे की, तुम्ही हा निर्णय मागे घ्या. पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हा, असे सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे.
साहेबांनी चुल बदलली : बोलताना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भावूक झाले होते. त्याचप्रमाणे शरद पवार यांना बघून आम्ही राजकारणात आलो, असे अनेक महिलांनी म्हटले. साहेबांनी भाकरी बदलायला सांगितले होते, तर साहेबांनी चुल बदलली हे काही बरोबर नाही. अशी भावना सुद्धा या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना आता महाराष्ट्रात दिसत आहेत. अल्पसंख्यांक समाजाचेही लोक मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते.
सर्वांचे आदर्श असल्याची भावना : शरद पवारांना एक सर्वसमावेशक नेता म्हणून पाहिले जाते. सगळ्या राष्ट्रीय कामांमध्ये शरद पवारांचे योगदान मोठे आहे. महिला, पुरुष, तरुण, यांसाठी ज्यानी काम केले, ते शरद पवार हे शेवटपर्यंत असेपर्यंत ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिले पाहिजे. कारण ते आमच्या सर्वांचे आदर्श असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याने चर्चा करण्याची मागणी केलेली आहे. फेरविचार करणार का? अशी चर्चा होत आहे. हा निर्णय मागे घेण्याची भूमिका कार्यकर्ते करत आहेत. आता शरद पवार साहेब या सगळ्या गोष्टीला कसे उत्तर देतात? याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.