ETV Bharat / state

MLA Rohit Pawar Self Immolation Protest :आमदार रोहित पवारांचे संभाजी महाराजांच्या समाधीजवळ आत्मक्लेश आंदोलन

आज आम्ही एक शिवभक्त म्हणून आत्मक्लेश करत आहे, असे मत राकाँ आमदार रोहित पवार यांनी मांडले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Agitation against Governor Koshyari) यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्यामुळे (contempt of Shivaji Maharaj) महाराष्ट्रातील राजकीय पक्ष दुखावले आहेत. (agitation against Governor as well as BJP leaders) या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवार यांच्यामार्फत  संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वढूमध्ये आत्मक्लेश आंदोलन (MLA Rohit Pawar self immolation protest) करण्यात येत आहे. Latest news from Pune

MLA Rohit Pawar Self Immolation Protest
आत्मक्लेश आंदोलन
author img

By

Published : Dec 3, 2022, 10:30 PM IST

पुणे : आज राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Agitation against Governor Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अवमान (contempt of Shivaji Maharaj) केल्यानंतर राज्यात राज्यपाल तसेच भाजप नेत्यांविरोधात आंदोलन (agitation against Governor as well as BJP leaders) करण्यात आले आहे. आज छत्रपती उदयनराजे यांच्यावतीने रायगडावर आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवार यांच्यामार्फत संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वढूमध्ये आत्मक्लेश आंदोलन (MLA Rohit Pawar self immolation protest) करण्यात येत आहे. Latest news from Pune

यांच्या पक्षातील नेते गप्प का बसले आहेत : आज आम्ही एक शिवभक्त म्हणून आत्मक्लेश करत आहे.आज भाजपचे नेते राज्यपाल तसेच त्यांच्या नेत्यांचे पाठराखण करत आहे. दिल्लीत महाराजांच्या बोलल्या वर राज्यात तोंड बंद करत आहे. म्हणून तर आम्ही आज आत्मक्लेश करत आहेत. महाराष्ट्रात अवमान होतोय आणि यांच्या पक्षातील नेते गप्प का बसले आहेत. आम्ही हे म्हणत नाही की तोडफोड करा. पण कुठेतरी संताप व्यक्त झाला पाहिजे असे यावेळी रोहित पवार म्हणाले. आमच्या सगळ्यांची मागणी आहे की राज्यपाल यांना हटवलं पाहिजे. तसेच जे दिल्लीत बसले आहे त्यांचे देखील कार्यक्रम आत्ता करायला पाहिजे. तसेच ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अवमान केले आहे. त्यांच्यावर कारवाई करायला हव अस देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.

महाराष्ट्र हा नेहमीच उजवा राहिला : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जात असल्याने महाराजांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला, अस्मितेला आणि देशातील शिवप्रेमींच्या भावनेला ठेच पोचत आहे. महाराष्ट्र हे नावाप्रमाणेच ‘महान’ असं राज्य आहे. या राज्याचा भूगोल जसा वैविध्यपूर्ण आहे तसा इतिहासही समृध्द आणि प्रेरणादायी आहे. स्वराज्याची उभारणी करणारे छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे परिश्रम आणि असंख्य संत-महात्म्यांच्या विचारांच्या पायावर आज आपला महाराष्ट्र उभा आहे. म्हणून अन्य कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र हा नेहमीच उजवा राहिला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवराय, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्याची जणू राजकारण्यांमध्ये स्पर्धाच लागल्याचे दिसत आहे. विशेषतः परराज्यातून येऊन विविध उच्च पदांवर बसलेल्यांकडून वारंवार अवमान होत असताना तो निमूटपणे पहात बसणे हे मनाला अत्यंत वेदना देणारे आहे. चूक ही एक वेळ होऊ शकते परंतु वारंवार होत असेल तर ती चूक नसते तर जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे रचलेले एक षडयंत्र असते. काही छुपे अजेंडे सेट करण्यासाठी तर हे षडयंत्र रचले जात नाही ना, अशी शंका सामान्य लोकांच्या मनामध्ये येतेय.

महाराष्ट्रद्वेषी प्रवृत्तीचा तीव्र विरोध : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती-धर्माच्या माळव्यांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या स्वराज्यात भाजीच्या देठालाही हात लावण्याची कुणाची हिंमत नव्हती. सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात होते. यामुळेच छत्रपती शिवराय हे जगाच्या पाठीवरील महापराक्रमी असे एक आदर्श राजे आहेत. पण अलिकडे कोणीही उपटसुंभ उठतो आणि महाराजांचा आणि इतर थोर पुरुषांचा अवमान करतो, हे अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारं आहे. अशा गोष्टी जेंव्हा घडतात आणि त्यावर आपण काहीच का करु शकत नाही, या विचाराने आणि महाराष्ट्रद्वेषी प्रवृत्तीचा तीव्र विरोध आणि धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभीमानी नागरीक म्हणून आत्मक्लेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.अस यावेळी रोहित पवार म्हणालेयामध्ये त्यांच्यासोबत आणखी काही आमदार, नागरिक, युवा व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.

महाराजांच्या विचारांच्या पालखीचे भोई : छत्रपती शंभूराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्ताचे वारसदार असून त्यांचे विचार, निष्ठा, शौर्य, धैर्य, कर्तृत्व, पराक्रम यावर प्रेम करणारे सर्व मावळे आणि महाराजांच्या विचारांच्या पालखीचे भोई आहोत. आज शंभूराजे असते तर शिवाजी महाराजांच्या अवमानाचं त्यांना जेवढं दुःख झालं असतं तेवढंच दुःख आज आम्हाला आणि तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक जातीधर्माच्या स्वाभीमानी महाराष्ट्र प्रेमी जनतेला होतंय, यात कोणतीही शंका नाही. म्हणूनच महाराजांच्या अवमानाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी विचारपूर्वक संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जात आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.