ETV Bharat / state

Ajit Pawar Criticism: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अंतर्गत वाद? पहा काय म्हणाले अजित पवार - शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान

Ajit Pawar Criticism: समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नाही. याबाबत विचारलं असता ते म्हणाले की समृद्धी महामार्गच्या पत्रिकेत नाव नाही, पण मला आमंत्रण आलं आहे. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणारा, वेळ कमी होणार, पुढचा टप्पा लवकर होण्या करता काम सुरू आहे. आमच्या सरकारच्या काळातही समृद्धी महामार्गला मदत दिली. आम्ही त्यावेळेस उदघाटन करणार होतो, पण एका ब्रिजच काम राहील. त्यामुळे नाही करता आलं. त्याला बाळासाहेब ठाकरे याच नाव देण्यात आलं आहे. काही अडचणी आहेत, पण होईल सगळं काम. मोठा रस्ता होतोय. असे यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत.

NCP leader Ajit Pawar
NCP leader Ajit Pawar
author img

By

Published : Dec 11, 2022, 12:19 PM IST

पुणे: समृध्दी महामार्गावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू आहे, अशी चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना याबाबत विचारलं असता अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देत त्या दोघांचं त्या दोघांना लखलाभ, म्हणत टोला लगावला आहे. पुण्यात आज बारामती होस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिराचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

आमच्या सरकारच्या काळातही समृद्धी महामार्गला मदत: यावेळी पवार यांना समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नाही. याबाबत विचारलं असता ते म्हणाले की समृद्धी महामार्गच्या पत्रिकेत नाव नाही, पण मला आमंत्रण आलं आहे. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणारा, वेळ कमी होणार, पुढचा टप्पा लवकर होण्या करता काम सुरू आहे. आमच्या सरकारच्या काळातही समृद्धी महामार्गला मदत दिली. आम्ही त्यावेळेस उदघाटन करणार होतो, पण एका ब्रिजच काम राहील. त्यामुळे नाही करता आलं. त्याला बाळासाहेब ठाकरे याच नाव देण्यात आलं आहे. काही अडचणी आहेत, पण होईल सगळं काम. मोठा रस्ता होतोय. असे यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबतीत काय म्हणाले

महापुरुषांबाबत बोलताना योग्य बोलले पाहिजे: अजित पवार यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाहीफेक करण्यात आली. याबाबत विचारण्यात आल तेव्हा ते म्हणाले की, कोणी मोठी व्यक्ती असली की त्याला एक्स वाय सुरक्षा दिली जाते. कुठल्याही व्यक्तीवर असे शाई फेक करू नये. ते चुकीचं आहे. वैचारिक मतभेद असतील, पण कायदा हातात कोणी घेऊ नये. आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही. याची काळजी घ्यावी. शाल जोडीतील शद्ब वापरता येतात. पण कालची गोष्ट चुकीचीच आहे. पण अस असल तरी आपण बोलताना तसेच महापुरुषांबाबत बोलताना योग्य बोलले पाहिजे, आपल्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखवणार तर नाही ना, असे बोलणं टाळल पाहिजे. बोलताना तारतम्य बाळगला पाहिजे, असे देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत.

निष्पाप व्यक्तीवर कारवाई करू नये: काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही पीक करण्यात आली. त्या प्रकरणात 11 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे याबाबत अधिक पवार यांना विचारले असता ते म्हणाले की कारवाई करावी पण कोणावर अन्याय होऊ नये. निष्पाप व्यक्तीवर कारवाई करू नये.अस देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सीमावाद प्रश्न बाबत बैठकीचा आयोजन करण्यात आला आहे यावर अजित पवार यांना विचारल असता ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा शिकवला आहे.तस गनिमी कावा करत सगळ्या लोकांचा विचार करून तिथं मुद्दे मांडावे.मुख्यमंत्र्यांनी मला विचारला तर गनिमी कावा बद्दल मी सांगेन.असा जाहीर गनिमी कावा सांगितला तर कर्नाटक पर्यत जाईल ना अस देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत.

स्पीडवरून कोणी कोर्टात जाऊ नये: समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी पाहणी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, समृद्धी महामार्ग वर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यानी पाहणी केली आहे. उपमुख्यमंत्री यांनी गाडी चालवली. पण ती गाडी कोणाची ? मुख्यमंत्र्यांच्या गाडीच स्पीड पाहिलं. एका महामार्गवर एक स्पीड दुसऱ्या महामार्गवर वेगळं स्पीड असे कोण ठरवत माहिती नाही. या स्पीडवरून कोणी कोर्टात जाऊ नये म्हणजे झालं, असे देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.