ETV Bharat / state

भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी जागरण गोंधळ

author img

By

Published : Oct 11, 2020, 3:29 PM IST

भीमा पाटस कारखाना गेल्या वर्षी बंद राहिला. यावर्षी प्रचंड ऊसाचे क्षेत्र आहे. उसाचे गाळप करून ही ऊस शिल्लक राहिल अशी परिस्थिती आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत भीमा पाटस कारखाना सुरू झाला पाहिजे. शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. कामगारांचे थकीत पगार देण्यात यावेत यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, अशी माहिती रमेश थोरात यांनी दिली.

jagran gondhal agitation to start bhima patas factory at dound taluka in pune district
भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी जागरण गोंधळ

दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा आणि कामगारांचे थकीत पगार देण्यात यावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भीमा पाटस कारखान्यावर जागरण गोंधळ घालण्यात आले. या जागरण गोंधळात देवीला कारखाना सुरू होण्यासाठी साकडं घालण्यात आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आज सकाळी भीमा पाटस कारखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी कारखान्यावर रमेश थोरात यांनी सांगितले, की भीमा पाटस कारखाना गेल्या वर्षी बंद राहिला. यावर्षी प्रचंड ऊसाचे क्षेत्र आहे. उसाचे गाळप करून ही ऊस शिल्लक राहिल अशी परिस्थिती आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत भीमा पाटस कारखाना सुरू झाला पाहिजे. शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. कामगारांचे थकीत पगार देण्यात यावेत यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, अशी माहिती दिली .

पुढे बोलताना म्हणाले, की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कारखान्यास 36 कोटी रुपये मदत दिली. मात्र, त्यानंतरही कारखाना सुरळीतपणे सुरु होवू शकला नाही हे दुर्दैव आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना उपस्थित नेत्यांनी दिले. या आंदोलनावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भीमा पाटस कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झालाच पाहिजे, कामगारांचे थकीत पगार मिळालेच पाहिजेत, असे फलक हातात घेतलेले होते. यावेळी वैशाली नागवडे, अशोक दिवेकर, हनुमंत वाबळे, आप्पासाहेब पवार यांसह अनेकांनी मनोगते व्यक्त केली. आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पुणे जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, पंचायत समिती सभापती आशा नितीन शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, तुषार थोरात, नितीन दोरगे, विकास खळदकर, सत्वशील शितोळे, प्रशांत शितोळे, नितिन शितोळे, दिलीप हंडाळ, शिवाजी ढमाले, राहुल आव्हाड, संपत भागवत यांसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.