ETV Bharat / state

राहुल यांच्याकडे सातत्याची कमी; शरद पवारांनी व्यक्त केले मत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पुणे येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

sharad pawar on Rahul gandhi
शरद पवार राहुल गांधी मत
author img

By

Published : Dec 4, 2020, 11:53 AM IST

पुणे - देशाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे सातत्याची कमतरता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार बोलत होते. मात्र, त्यांनी बराक ओबामा यांनी राहुल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला बगल दिली.

प्रत्येकाचा दृष्टीकोण विचारात घेण्याची गरज नाही -

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे 'ए प्रॉमिस्ड लँड' हे 768 पानांचे पुस्तक 17 नोव्हेंबरला प्रकाशित होत आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी राहुल गांधी, डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा उल्लेख केला आहे. 'राहुल गांधी एका विद्यार्थ्याप्रमाणे आहेत. ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना आपल्या शिक्षकाला प्रभावितही करायचे आहे. मात्र, त्या विषयात प्रभुत्व मिळण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्यांच्यात तेवढी उत्कटता नाही', असे वर्णन ओबामांनी राहुल गांधींचे केले आहे. याबाबत शरद पवार यांचे मत विचारले असता, एखाद्या व्यक्तीबाबत प्रत्येकाचा दृष्टीकोण विचारात घेण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.

गांधी कुटुंबाविषयी आजही आदर -

आपण दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रातील नेतृत्वाबाबत बोलू शकत नाहीत. मात्र, आपल्या देशातील नेतृत्वाबाबत नक्कीच बोलू शकतो. माझ्या मते ओबामांनी राहुल गांधी यांच्याबाबत टिप्पणी करून ही मर्यादा ओलांडली आहे, असे शरद पवार म्हणाले. एखाद्या पक्षाचे नेतृत्व करणे ही बाब त्या पक्षातील लोकांमध्ये आपल्या नेत्याबाबत काय भावना आहे, यावर अवलंबून आहे. माझे सोनिया गांधी आणि गांधी परिवाराशी काही वैचारिक मतभेद निश्चत आहेत. मात्र, मी ठामपणे सांगू शकतो आजही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात गांधी आणि नेहरू कुटुंबाबाबत नितांत आदर आहे, असेही पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.