पुणे - पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांना गुलाबपुष्प देऊन आंदोलकांनी इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला.
देशात नागरिक कोरोनाच्या संकटाने त्रस्त झाले आहेत. त्यात आता इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोलचे शंभरी गाठली आहे. आता खाद्यतेलांचे ही दर सातत्याने वाढत आहेत. याला जबाबदार मोदी सरकार असुन त्यांनी नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महागाई वाढवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर कमी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरवात
अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन -
पेट्रोल डिझेलचे दर शतकी वाटचाल करत असताना केंद्र सरकार सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. गेले वर्षभर लॉकडाऊनने मोठे नुकसान झाले आहे. त्यात सातत्याने दररोज मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. केंद्र सरकारने येत्या काळात जर पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा - वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात साचले पावसाचे पाणी
गुलाब पुष्प देऊन निषेध -
आंदोलनादरम्यान, नागरिकांना आज अभिनव पद्धतीने पेट्रोल पंपवर येणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प देऊन इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.