ETV Bharat / state

National Flag of India News : महात्मा गांधीजींचे विचार टिकवण्यासाठी पुण्यातील तरुणाचा पुढाकार, राबविला 'हा' अनोखा उपक्रम - independence day special story

महात्मा गांधीजींचे विचार आजच्या आधुनिक युगात टिकून राहावे, यासाठी पुण्यातील काही तरूणांनी एक उपक्रम राबविला आहे. यासाठी त्यांनी गांधीजी चालवत असलेल्या चरख्याला आधुनिक रूप देऊन आठवड्यातून दोन तास स्वतः सूत बनवण्याचे ठरवले. मागील सहा महिन्यांपासून हे तरुण सूत काढण्याचे काम करत आहे. या सूतापासून त्यांनी 15 ऑगस्ट रोजी दोन ध्वज तयार केलेले आहेत. त्यातील एक ध्वज पुण्यातील गांधीभवन येथे मंगळवारी ध्वजारोहन करण्यासाठी वापरण्यात आला आहे. याविषयी अधिक सविस्तर आपण या विशेष रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Pune Youth Success Story
कोथरूड चरखा संघाचे पदाधिकारी
author img

By

Published : Aug 16, 2023, 11:51 AM IST

कोथरूड चरखा संघाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मोलाचे योगदान आहे. गांधीजींनी त्यांच्या आचरणातून देशाला दिशा दिली. ते स्वत: चरख्यावर सूत बनवायचे. त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता. त्यांचे हेच विचार जिवंत ठेवण्यासाठी पुण्यातील अजिंक्य देसाई, संजय मानकर, तेजस पवार, उमेश ठाकूर, सचिन चव्हाण, माधव सहस्रबुद्धे, जिंदा सांडभोर, अनिल पावर यांच्यासोबत त्यांच्या काही सहकारी मित्रांनी पुण्यात कोथरूड चरखा संघाची स्थापना केली.

गांधी विचारातील लोकांचा सहभाग : या तरूणांनी चरखा संघाची स्थापना करून एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. इतक लोकांना सुद्धा ते या संघामध्ये सहभागी करून घेत आहेत. दिवसेंदिवस लोकांचा या उपक्रमात सहभाग वाढत आहे. या प्रशिक्षणात भारत सरकारचे माजी अर्थसचिव एस. पी. शुक्ल आणि खासदार सुप्रिया सुळे त्याचबरोबर अनेक राजकीय सामाजिक गांधी विचारातील लोकांनी सहभाग घेतलेला आहे.

चरखा चालवण्यासाठी प्रशिक्षण : हे सगळे तरुण आपापल्या व्यवसायात आणि नोकरीत व्यस्त असतात. तरीदेखील ते गेल्या सहा महिन्यांपासून दर रविवारी एकत्र येतात. जवळपास 15 ते 20 चरख्यावरती हे सूत काढतात. संघात येणाऱ्या प्रत्येकाला सूत काढण्यासाठी, चरखा चालवण्यासाठी प्रशिक्षण देतात. दिवसेंदिवस त्यांच्या या प्रशिक्षणाची माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे. आता अनेक लोक हात चरखा शिकून या ठिकाणी सूत काढत आहेत. हेच तयार झालेले सूत त्यांनी वर्ध्याला पाठवले. तेथे दोन ध्वज तयार करण्यात आले. त्यातील एक ध्वज मंगळवारी ध्वजारोहणासाठी गांधीभवन येथे पुण्यात वापरण्यात आला आहे.

उपक्रमाचा उद्देश : गांधीजींचे विचार हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. तसेच आधुनिक जगात चरख्याची ओळख राहिली पाहिजे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी चळवळ तयार करण्यात आली, त्या चळवळीमध्ये चरखाच्याचे सुद्धा फार महत्त्व आहे. आधुनिक जगात मनाला शांती मिळावी. एका जागी, एका ठिकाणी मन एकाग्र होऊन बुद्धी शांत व्हावी. प्रसन्न वाटावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

सुतापासून ध्वज तयार केला : आम्ही तयार केलेल्या सुतापासून आज एक ध्वज तयार झालेला आहे. ही अखंड भारताची ओळख आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गांधीजी हे खिशात असून चालत नाही, तर ते डोक्यात असावे लागतात. या उपक्रमातून ते विचार डोक्यात येतील, याच उदात्त हेतूने हा उपक्रम राबवत असल्याचे सगळ्या तरुणांनी सांगितले आहे. आधुनिक तंत्रज्ञान असताना सुद्धा गांधीजींनी वापरलेल्या पारंपारिक तंत्रज्ञानाचा वापर करून गांधीजींचे विचार आपण जिवंत ठेवू शकतो, हे या तरुणांनी दाखवून दिलेले आहे.

हेही वाचा :

  1. गांधी जयंती विशेष..! महात्मा गांधी अन् चरख्याचे नाते सांगणारा इतिहास
  2. प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलाय हा जगातील सर्वात मोठा 'चरखा'..!
  3. राष्ट्रपतींनी सेवाग्राम आश्रमाला दिली भेट; चरखा चालवत केली सूतकताई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.