ETV Bharat / state

National Anthem In PCMC : 15 ऑगस्टपासून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत दररोज सकाळी वाजणार राष्ट्रगीत - National Anthem

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Azadi Ka Amrit Mohotsav) वर्षाचे औचित्य साधून यावर्षीपासून (Pimpri Chinchwad Municipal Corporation) महापालिकेच्या पिंपरी येथील, मुख्य प्रशासकीय भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता राष्ट्रगीत ( National Anthem In PCMC ) वाजवले जाणार आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी निर्णय घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच दि. १५ ऑगस्ट २०२२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पाटील यांनी दिले आहे.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation
पिंपरी चिंचवड महापालिका
author img

By

Published : Jul 22, 2022, 8:19 PM IST

Updated : Jul 23, 2022, 11:17 AM IST

पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Azadi Ka Amrit Mohotsav) वर्षाचे औचित्य साधून यावर्षीपासून महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) पिंपरी येथील, मुख्य प्रशासकीय भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता राष्ट्रगीत ( National Anthem In PCMC ) वाजवले जाणार आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी निर्णय घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच दि. १५ ऑगस्ट २०२२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पाटील यांनी दिले आहे. याबाबत मनसेचे पदाधिकारी रुपेश पटेकर यांनी पाठपुरावा केला होता, त्याला यश प्राप्त झाले आहे.

प्रतिक्रीया

हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणा-या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता प्रत्येकाच्या अंगी यावी म्हणून, प्रत्येकजण सदैव प्रयत्न करत असतो.

देशाचे मंगलगान : या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामकाजासाठी महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये देशाप्रती असलेला आदर अधिक वृद्धींगत करणे. तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेची ज्योत तेवत ठेवण्यासोबतच शिस्त आणि सकारात्मक उर्जा वाढविणे. यासाठी महापालिकेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजता ‘जन गण मन’ राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. राष्ट्रगीतातून होणारे देशाचे मंगलगान आपल्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करत असते. शिवाय सेवेची भावना देखील यातून वृद्धिंगत होत असते. शासकीय कार्यालयांमध्ये अशी प्रथा सुरु करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : Rajya Sabha Adjourned : महागाईच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, राज्यसभेचे कामकाज तहकूब

Last Updated : Jul 23, 2022, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.