पुणे Congress Aggressive Against Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय? असा प्रश्न विचारत टीका केली. याच्या निषेधार्थ आज (14 जानेवारी) पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिवंत कोंबडी आणून निषेध व्यक्त केला. तसंच यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपा भावनेवर निवडणूक लढवतंय : यावेळी बोलत असताना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, "प्रभू श्रीराम आमचे आहेत. आमच्या नसा-नसात प्रभू राम आहेत. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येला जाऊन कुलूप काढून मंदिर दर्शनासाठी खुल केलं होतं. तसंच तेव्हा त्यांनी देशात रामराज्य आणू, अशी घोषणा केली होती. मात्र, भाजपा लोकांच्या भावनांचा वापर करत निवडणूक लढवत आहेत. तसंच नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. नारायण राणे आणि मुलांनी राजकारणाचा स्थर खाली आणण्याचं काम केलंय. भाजपाने त्यांना भुंकण्यासाठी ठेवलं आहे. मोदी हे शंकराचार्यांपेक्षा मोठे असल्याचं जर दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे निषेधार्ह असल्याचंही आमदार धंगेकर म्हणाले.
पोटात एक आणि ओठावर एक : यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, "प्रभू रामाचं राम मंदिर हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. राम मंदिराचं उद्घाटन होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. पण असं असताना नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलं ते निषेधार्य आहे. शंकराचार्य यांचं महत्त्व कमी करून मोदींना त्यांच्यापेक्षा मोठं दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केला. तसंच पोटात एक आणि ओठावर एक हे यातून निष्पन्न झाल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा -