पुणे : आज केंद्रीय मंत्री नारायण राणे पुणे दौऱ्यावर असताना कार्यक्रमानंतर देशातील तसेच राज्यातील इतर विषयावर राणे यांना प्रश्न विचारण्यात आले. पण जेव्हा त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Refused to take Uddhav Thackerays name) यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की नाव नको घेऊ... जय हिंद जय महाराष्ट्र, असं विधान राणे यांनी ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर केलं आहे. (FICCI) एफआयसीसीआय महिला आघाडी आयोजित राष्ट्रीय प्रदर्शन व परिषद उद्घाटन समारंभ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे पुण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. (Narayan Rane Criticised to oppositions)
राज्यातून इतर राज्यात जे उद्योग चालले आहे. यावर राणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, आज जी टीका केली जात आहे. ती राजकीय हेतूने केली जात आहे. काल पर्यंत जे सत्तेत होते. तेच या राज्यात उद्योग आणू शकले नाही. त्यांनी काहीही आणलं नाही, म्हणून ते आज आमच्यावर टीका करत आहे. आम्ही जेव्हा उद्योग आणू तेव्हा बेरोजगारी कमी करू ते पहा ना. आत्ता तर राज्यात सत्तेत येऊन तीनच महिने झाले आहे. पुढे पहा ना काय होतं? काय होत नाही. राज्यात उद्योग यायला उद्योजक वेटींग वर आहे आणि खूप पोषक वातावरण या राज्यात आहे, असं यावेळी राणे म्हणाले.
सध्या राज्यात हर हर महादेव चित्रपटावरून जे वाद सुरू आहे. यावर राणे यांना विचारलं असता, ते म्हणाले की मी मनोरंजनाचा विषय हाताळत नाही. सध्या मी उद्योग द्यायला आलो आहे. त्याबाबत मला विचारा. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली यावर राष्ट्रवादी पक्षाकडून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावर राणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, तो पक्षच फेक आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट फेक दिसत असते, असं यावेळी राणे म्हणाले.
विरोधकांकडून ओला दुष्काळ राज्यात जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे, यावर राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, हेच उद्धव ठाकरे अडीच वर्ष सत्तेत होते. मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काही मदत केली का ? तसेच निवडणुकीपूर्वी देखील त्यांनी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करू, असं सांगितलं होतं. ते त्यांनी केलं का? आत्ता औरंगाबादला गेले तेव्हा ते किती तास शेतकऱ्यांबरोबर होते? अडीच वर्ष मातोश्री च्या घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता टीका करणे हे बंद करावे, असं यावेळी राणे म्हणाले.
भारत जोडो यात्रा बाबत राणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, भारत जोडो यात्रा नव्हे तर ही काँग्रेस तोडो यात्रा आहे. राहुल गांधी यांचं पायगुण आहे की ते जिथं जातात तिथं ते काँग्रेस तोडतात, अशी टीका यावेळी राणे यांनी केली.