ETV Bharat / state

MLA Banner In Pune: कसबा पोटनिवडणूक; निकालाआधीच दोन्ही उमेदवारांचे लागले विजयाचे बॅनर

कसबा पेठ आणि चिंचवड या पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडले. तर मतमोजणी गुरूवारी म्हणजेच 2 मार्चला होणार आहे. पण मतमोजणीच्या आधीच कसबा मतदार संघातील दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. निकालाआधीच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीला सुरूवात करण्यात आली आहे.

MLA Banner In Pune
दोन्ही उमेदवारांचे लागले विजयाचे बॅनर
author img

By

Published : Feb 28, 2023, 12:15 PM IST

निकालाआधीच दोन्ही उमेदवारांचे लागले विजयाचे बॅनर

पुणे : सारसबाग चौक तसेच वडगांव परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची आमदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शहरातील मुख्य भागात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचे विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. निकालाआधीच दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत. यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. येत्या 2 तारखेला निकाल लागणार असून कोण उमेदवार जिंकणार आहे, याआधीच बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

अनेक आरोप प्रत्यारोप: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राज्यातील सर्वच आजी-माजी मंत्री यांच्या सभा रॅली तसेच कोपरा मीटिंग घेण्यात आले होते निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटचं मतदान होण्यापर्यंत दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत होते. तसेच आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर सातत्याने कसबा पोट निवडणुकीत वेगवेगळे घटना पाहायला मिळाल्या. सूरवातीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी बाबत झालेलं नाराजी नाट्य,त्यानंतर महा विकास आघाडीमध्ये झालेलं बंड हे देखील कसबा पोटनिडणुकीत बघायला मिळाले.

राज्यातील सर्वच नेते मंडळी कसब्यात: कसबा पोटनिवडणुकीत सुरूवाती पासूनच प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा प्रामुख्याने बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक खासदार गिरीश बापट तसेच सर्वच नेतेमंडळी प्रचारात पहायला मिळाले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी यांचे प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळाले.या सर्व नेते मंडळींकडून प्रचारात कसबा मतदार संघातील स्थानिक मुद्दे कमी तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तसेच राज्य आणि देशातील मुद्दे प्रमुखाने मांडण्यात आले.

खासदार गिरीश बापट यांचे महत्त्व: कसबा मतदारसंघ म्हटले की, खासदार गिरीश बापट यांचे नाव आलाचे कारण गेल्या पाच वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट यांना कसब्यातील किंगमेकर असे म्हटले जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून खासदार गिरीश बापट हे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अशातच आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत बापट प्रचाराला येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी असतील तसेच विरोधी पक्षातील नेते मंडळी असतील या सर्वच नेत्यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार दिलीप पाटील यांची भेट घेतली. दुसऱ्याच दिवशी बापट प्रचाराला आले. बापट हे जरी हेमंत रासने यांच्या प्रचाराला आले असले तरी विरोधकांकडून भाजप वर जोरदार टिका करण्यात आली होती.

अनेक आरोप प्रत्यारोप: कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून दोन्ही उमेदवाराकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले खासदार गिरीश बापट यांचा मुद्दा असेल किंवा काँग्रेसकडून बंडखोरीचा मुद्दा असेल, असे अनेक प्रश्न या पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राज्यातील सत्ता संघर्ष आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन हे देखील विषय याच पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले.

हेही वाचा: Ravindra Dhangekar MLA Banner कसबा निकलाआधीच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे लागले आमदार म्हणून बॅनर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.