ETV Bharat / state

Murder With Hammer In Pune : पुण्यात सख्ख्या चुलत भावाचा हातोडीने घाव घालून खून.. - National Heavy Company

सख्ख्या चुलत भावाबरोबर काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेवत हातोडीने घाव घालून सख्ख्या चुलत भावाचा खून करण्यात ( Murder With Hammer In Pune ) आला. ही घटना पुणे जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये ( Talegaon Dabhade In Pune ) घडली. पोलीस तपासात हत्येचा प्रकार उघड ( Police Cracked Murder Case ) झाला.

Murder
पूर्ववैमनस्यातून सख्ख्या चुलत भावाचा हातोडीने घाव घालून खून
author img

By

Published : Dec 23, 2021, 4:34 PM IST

पुणे - पुण्याच्या तळेगावमध्ये ( Talegaon In Pune ) सख्ख्या चुलत भावानेच भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी ( Talegaon Dabhade Police ) ताब्यात घेतलं आहे. ही घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली आहे. अणकुचीदार हातोडीने घाव घालून खून करण्यात आला ( Murder With Hammer In Pune ) आहे. अगोदर, हा खून गोळी झाडून केल्याच सांगण्यात येत होतं. परंतु, शवविच्छेदन अहवालात हातोडीचा घाव असल्याचं निष्पन्न झाले आहे. पूर्वी झालेल्या भांडणातून खून केला असल्याच पोलीस तपासात समोर आलं ( Police Cracked Murder Case ) आहे.
दुचाकी घेऊन गेला, परत आलाच नाही

दशांत परदेशी (वय 17) असं खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल परदेशी यांनी तळेगाव पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशांतचा खून झाल्यानंतर तळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा दशांत हा दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरीच आला नाही. त्यामुळं त्याचा शोध घरातील व्यक्ती आणि नातेवाईक घेत होते. तेव्हा, नॅशनल हेवी कंपनी ( National Heavy Company ) परिसरात त्याचा मृतदेह आढळला आहे.

शवविच्छेदन अहवालात खुनाचा प्रकार उघडकीस

हातोडीने घाव घालून खून केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. अगोदर गोळी लागल्याचे सांगण्यात येत होतं. अखेर शवविच्छेदन अहवालात त्याचा हातोडीने घाव घालून खून केल्याचं समोर आलं आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहेत. सख्ख्या चुलत भावाबरोबर काही महिन्यांपूर्वी दशांतचे भांडण झाले होते. यातूनच त्याचा खून केला असल्याचं तपासात पुढे आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.