ETV Bharat / state

आईवरून शिवीगाळ केल्याने भर रस्त्यात दगडाने ठेचून खून; घटना सीसीटिव्हीत कैद - pune crime news

मद्यपान केलेल्या अनिलने यशला आई वरून शिवीगाळ केली. याचा मनात राग धरून मद्यपान केलेल्या यशने रस्त्यावर पडलेला दगड घेऊन अनिलच्या डोक्यात घातला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दगडाने ठेचून खून
दगडाने ठेचून खून
author img

By

Published : Jun 2, 2021, 9:45 AM IST

Updated : Jun 2, 2021, 11:21 AM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - आईवरून शिवीगाळ केल्याने एका मद्यपीने दुसऱ्या मद्यपीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. यश गोपी असे बावीस वर्षीय आरोपीचे नाव असून अनिल शिंदे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आईवरून शिवीगाळ केल्याने भर रस्त्यात दगडाने ठेचून खून

डोक्यात दगड घालून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अनिल आणि यश या दोघे मद्यपान करून दापोडी येथील वस्तीमधून जात होते. तेव्हा, त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. मद्यपान केलेल्या अनिलने यशला आई वरून शिवीगाळ केली. याचा मनात राग धरून मद्यपान केलेल्या यशने रस्त्यावर पडलेला दगड घेऊन अनिलच्या डोक्यात घातला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भरदिवसा वस्तीत हत्या घडली मात्र, नागरीकांनी बघ्याची भुमिका घेतली होती. यशला अडवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. त्याचवेळी, भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी तातडीने येऊन यश अडवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Last Updated : Jun 2, 2021, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.