पिंपरी चिंचवड Mumbai Pune Express Way : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर 'हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम' अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी 9.800 (पनवेल एक्झिट) आणि कि.मी 29.400 (खालापूर टोल प्लाझा आणि मडप बोगद्यादरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 11 जानेवारीला दुपारी 1.30 ते 3.30 या वेळेत करण्यात येणार आहे. त्यादरम्यान, मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या तसंच जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. तर वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने आणि बसेस खोपोली एक्झिट कि.मी. 39.800 येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे मुंबई महामार्गा वरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील. तसंच पुण्याहून मुंबईकडं जाणारी हलकी आणि जड अवजड वाहने ही खालापूर टोलनाका येथील डाव्या बाजूकडील शेवटची लेन खालापूर एक्झिट येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे मुंबई महामार्गावरून खालापूर शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.
पुढील काही महिने देखील ब्लॉक घेतले जाणार : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गेल्या काही महिन्यांपासून असे ब्लॉक घेतले जात आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडत आहे. पुढील काही महिने देखील ब्लॉक घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येनं वाहनं ये-जा करत असतात. मात्र, ब्लॉकमुळं महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्यानं वाहनचालकांना मोठा मनस्ताप होणार आहे. तसंच या मार्गावर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून तब्बल 340 कोटींचा हा प्रकल्प आहे. सध्या याचीच कामं या मार्गावर सुरू आहेत.
हेही वाचा -