पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली जवळ काही गाड्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास सात ते आठ गाड्या या एकमेकांना धडकल्या आहेत. यात गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.अपघातात काहीजण जखमी असल्याची माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी या अपघातात झाली नाही. अपघात झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
अचानक ब्रेक लावल्यामुळे अपघात: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात ते आठ गाड्यां या एकमेकांवर जोरदार आदळल्या आहे.या ठिकाणी अपघात झाल्याने या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तातडीने घटना स्थळी भेट देऊन मदत कार्य सुरू केले. मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.या मार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. मात्र आजचा हा अपघात भयानक अपघात झालेला आहे, पुढच्या वाहन चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे. खोपोली एक्झिट जवळील उतरणीच्या जागेवरून गाड्या येत असल्यामुळे सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार धडकलेल्या आहे. जखमी झालेल्या रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
खासगी प्रवासी बस पलटी झाली: या आधीही असे अपघात घडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील भांडगाव येथे एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात एक खाजगी प्रवासी बस पलटी झाली होती. या अपघातात १० प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर महामार्गावर काही वेळ मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी देखील झीली होती. हा अपघात 25 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला होता. तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.