ETV Bharat / state

Oil Tanker Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ ऑइल टँकरचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, दोनजण गंभीर जखमी - Mumbai Pune Expressway

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. लोणावळ्याजवळील ओव्हरब्रिजवर ऑइल टँकरचा भीषण अपघात झाला आहे. टँकरने पेट घेतला आहे.

Oil tanker accident
ऑइल टँकरचा अपघात
author img

By

Published : Jun 13, 2023, 1:25 PM IST

Updated : Jun 13, 2023, 1:37 PM IST

ऑइल टँकरचा अपघात

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे ब्रीजखाली देखील अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून त्यात एका बारा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, तर दोननजण गंभीर जखमी आहेत. ही आग लगल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे. एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात : आज सकाळीच बीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु तेलगळती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शहरात अपघाताचे सत्र वाढत चालले आहे. रस्त्यावर पडलेले ऑईल गोळा करण्यासाठी नागरिकांनी खूप गर्दी केलेली होती. टँकर मार्गावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते.

मेळघाटात एसटी बसचा मोठा अपघात : मेळघाटात एसटी बसचा सोमवारी भीषण अपघात झाला. या अपघातात बस दरीत कोसळली. परंतु बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही बस दरीतील एका झाडाला अडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघातातील बसमध्ये 64 प्रवासी होते. यापैकी काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी परतवाडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी परतवाडा आगारातून दुसरी गाडी प्रवाशांच्या सुविधेसाठी पाठवण्यात आली होती. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता.

हेही वाचा :

  1. Tanker Accident: बीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात; ऑइल गोळा करण्यासाठी नागरिकांनी केली एकच गर्दी
  2. ST Bus Falls Into Valley: मेळघाटात एसटी बस दरीत कोसळली; सर्व प्रवासी सुखरूप
  3. Big Train Accident Averted : रेल्वेचा मोठा अपघात टळला; एकाच रुळावरुन धावली मेमू आणि मालगाडी

Last Updated : Jun 13, 2023, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.