ETV Bharat / state

बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट - महावितरण अभियंत्याची आत्महत्या

अभियंता मनीष दंडवते यांनी किचनमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही बाब पोलिसांत कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून पंचांसमक्ष पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Feb 6, 2022, 12:09 AM IST

बारामती ( पुणे ) - बारामतीत महावितरणचे सहायक अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आज (शनिवारी) दुपारच्या समारास ही घटना घडली आहे. मनीष माधवराव दंडवते ( वय 43 वर्ष ) असे या आत्महत्या केलेल्या अभियंत्यांचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दंडवते हे बारामती येथील ऊर्जा भवन वसाहत येथे राहत होते. मागील दोन दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. सकाळी त्यांचा डबेवाला डबा देण्यासाठी आला असता दरवाजा उघडला नाही. दरवाजा उघडत नसल्याने डबेवाल्याने खिडकीतून आत पाहिले असता अभियंता मनीष दंडवते यांनी किचनमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही बाब पोलिसांत कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून पंचांसमक्ष पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. अभियंता हे उर्जा भवन कर्मचारी वसाहत येथे कुटुंब शिवाय राहत होते. त्यांचे कुटुंबीय सोलापूर या ठिकाणी वास्तव्यास आहे. पोलिसांमार्फत त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेबाबत कळविण्यात आले, असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा - Murder In Akole : दोघांचे भांडण, तिसऱ्याचा मृत्यू.. दांड्याने डोक्यात मारून केली हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.