ETV Bharat / state

बारामतीकरांनी संयम राखावा, अफवांना बळी पडू नये - खासदार सुप्रिया सुळे - बारामती कोरोना न्यूज

बारामती शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर तातडीने उपचार सुरू केले असून त्याच्याशी संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

baramati corona positive
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Mar 30, 2020, 9:28 AM IST

पूणे - बारामती शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर तातडीने उपचार सुरू केले असून त्याच्याशी संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

शहरात ज्या भागात हा रुग्ण आढळला आहे, त्या भागातील वाहतूक वळवण्यापासून अन्य आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. पूर्ण परिसर निर्जंतुक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात येत असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले. तसेच कोणत्याही अफवांना बळी न पडता संयम राखत प्रशासनाकडून येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सर्वांनी आपल्या घरातच थांबून या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करावी. गरज असल्याशिवाय घरातून कोणीही बाहेर पडू नये. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.