ETV Bharat / state

मातीशी संबंध असणाऱ्यांनाच पावसाचा आनंद, खासदार श्रीनिवास पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

author img

By

Published : Oct 30, 2019, 4:36 PM IST

Updated : Oct 30, 2019, 6:10 PM IST

ते शेतकरी आहेत की नाही हे ही आपल्याला माहीत नाही, असे सांगत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

खासदार श्रीनिवास पाटील

पुणे - काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी सुरू असताना किवा त्यापूर्वी येणाऱ्या पावसामुळे होणारा आनंद वेगळाच असतो. पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच होतो. त्यामुळे पावसाचा आनंद जसा शेतकऱ्यांना होतो तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला नाही. ते शेतकरी आहेत की नाही हे ही आपल्याला माहीत नाही, असे सांगत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

बोलताना खासदार श्रीनिवास पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा प्रचंड गाजली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर टोलेबाजी करताना पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला, असा टोला लगावला होता. त्याविषयी विचारले असता श्रीनिवास पाटील बोलत होते.

सातारा लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले, उदयनराजेंनी विकासाची कामे करण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे सांगितले होते. परंतु हे सबळ कारण नव्हते. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मत द्यावं ,अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. त्यामुळे मी बहुमताने निवडून आलो.

उदयनराजेंनी आता तरुणांना हाती घेऊन मोठे कारखाने आणून तरुणांना रोजगार दिला आणि शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळवून दिला आणि पुन्हा नव्याने चळवळ सुरू केली तर त्यांचं नेतृत्व आणखी बराच काळ चालेल. त्यांनी लोकांमध्ये जावं, त्यांचा विश्वास परत मिळवावा. राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहून त्यांनी कामे केली असती तर त्यांना याहीपेक्षा मोठी संधी मिळाली असती. संधीच्या शोधात पक्षांतर करणे हे कदाचित लोकांना आवडले नाही, असेही खा. पाटील म्हणाले.

Intro:काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी सुरू असताना किंवा त्यापूर्वी येणाऱ्या पावसामुळे होणारा आनंद वेगळाच असतो. पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच होतो..त्यामुळे पावसाचा आनंद जसा शेतकऱ्यांना होतो तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला नाही..ते शेतकरी आहेत की नाही हे ही आपल्याला माहीत नाही..असे सांगत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा प्रचंड गाजली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर टोलेबाजी करताना 'पावसात भिजण्याचा आमचा आनंद कमी पडला' असा टोला लगावला होता. त्याविषयी विचारले असता श्रीनिवास पाटील बोलत होते. Body:सातारा लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले, उदयनराजेंनी विकासाची काम करण्यासाठी
पक्षांतर करत असल्याचे सांगितले होते. परंतु हे सबळ कारण नव्हते. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मत द्यावं अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. त्यामुळे मी बहुमताने निवडून आलो.
Conclusion:उदयनराजेंनी आता तरुणांना हाती घेऊन मोठे कारखाने आणून तरुणांना रोजगार दिला आणि शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळवून दिला आणि पुन्हा नव्याने चळवळ सुरू केली तर त्यांचं नेतृत्व आणखी बराच काळ चालेल. त्यांनी लोकांमध्ये जावं, त्यांचा विश्वास परत मिळवावा. राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहून त्यांनी काम केलं असतं तर त्यांना याहीपेक्षा मोठी संधी मिळाली असती. संधीच्या शोधात पक्षांतर करणं हे कदाचित लोकांना आवडलं नाही.
Last Updated : Oct 30, 2019, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.