पुणे: गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील हडपसर परिसरातील कोयता गॅंग (Hadapsar Pune Koyta Gang) सक्रिय होत असून या गँगने परिसरात दहशत निर्माण केली आहे. या गँग विरोधात कारवाई (Action against Koyta Gang) करण्यासाठी थेट खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र (MP Amol Kolhe letter to Home Minister Fadvanis) लिहिले आहे. (Latest news from Pune) हडपसर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँग सक्रिय होत असून परिसरात तोडफोड, गाड्यांची तोडफोड, मार्केटमध्ये दहशत निर्माण करणे असे काम ही गँग करत आहे. (Pune Crime)
कोयता गॅंगविरुद्ध खासदार मैदानात : कोयता गँग विरोधात मांजरी आणि हडपसर परिसरातील नागरिकांनीही या आधी हडपसर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. आता या गँग विरोधात खासदारच मैदानात उतरले असून या गँगवर कारवाई व्हावी म्हणून कोल्हे यांनी थेट गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे.
दहशत पोलिसांची की गुंडांची ?
शहर-उपनगरामध्ये कोयता गँग सक्रिय होत असतानाच हडपसर आकाशवाणी समोरील सातव प्लॉट-बनकर कॉलनीमध्ये शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हातात कोयते फिरत होते. कोयता गँगमधील काहींनी गाड्यांचे नुकसान केले, त्यानंतर झाडे तोडली, याचवेळी दुचाकीचालकाच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही असे दिसत नाही. त्यामुळे बिनबोभाट गुन्हेगार वावरत आहेत. त्यामुळे पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर नाही, तर सामान्यांवर असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. आकाशवाणी सातव प्लॉट, बनकर कॉलनीमध्ये सामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.