पुणे - शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीच्या पुढे घोडेस्वारी करण्याचा ( MP Amol Kolhe horseracing ) शब्द पाळला आहे. त्यांनी खेडमधील दावडी लिंबगाव येथे खंडोबाच्या मानाच्या घाटात घोडीवर स्वार होऊन घाट गाजवला ( Amol Kolhe horseracing in Khandoba Ghat ) आहे. यावेळी घाटात एकच जल्लोष होता.
सर्वोच्च न्यायालच्या अटी आणि शर्थीसह बैलगाडा शर्यतील परवानगी देण्यात ( bull cart permission by court ) आली. त्यानंतर, पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड परिसरात जोरदार बैलगाडा शर्यती पार पडल्या आहेत. दरम्यान, घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडी घाटात या असा टोला शिवसनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( MP Shivajirao Patil takes jibe at MP Kolhe ) यांनी खासदार अमोल कोल्हे यांना लगावला होता. त्यामुळे ते घोडीवर स्वार होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता.
हेही वाचा-Bappi Lahiri Unseen Picture : बॉलिवूडचे दिग्गज गायक बप्पी लहिरी यांचे पाहा काही खास फोटो!
खासदार अमोल कोल्हे यांनी जिंकली सर्वांची मने-
आज खेडमधील मानाच्या खंडोबा घाटात अमोल कोल्हे यांनी घोडीवर स्वार होऊन घाट गाजविला आहे. दोन्ही हात उंचावत त्यांनी सर्वांना अभिवादन केले. पण सर्वांची मने जिंकली आहेत. पहिल्या बारीत संसदेचे सत्र असल्याने पहिल्य घोडीवर बसू शकलो नाही, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-Bappi Lahiri passes away : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन
सर्वोच्च न्यायालयाने 17 डिसेंबर रोजी बैलगाडा शर्यतींना दिली परवानगी
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी (Bullock Cart Race in Mharashtra) 17 डिसेंबरला 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.