पुणे: मुलीच्या प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱे वडील जॉन्सन कॅजीन लोबो यांचा आई, मुलगी आणि प्रियकराने काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी साईकृपा सोसायटी वडगाव शेरी येथील रहिवासी 23 वर्षिय अॅग्नेल जॉय कसबे याला ताब्यात घेवून चौकशी केली तेव्हा, त्याने गुडविल वृंदावन आनंदपार्क वडगाव शेरी पुणे येथिल रहवासी 43 वर्षीय सॅन्ड्रा जॉन्सन लोबो आणि एक विधीसंघर्षीत बालिका यांनी संगणमताने हा खून केल्याची कबूली दिली.
1 जून रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास सणसवाडी, ता. शिरूर, जि.पुणे येथे पुणे अहमदनगर हायवे रोड लगत पेट्रोल पंपाजवळ जितेंद्र ललवाणी यांचे प्लॉटींग जवळ एका अनोळखी पुरुषाचा खुन करुन प्रेत पेट्रोल टाकुन जाळुन टाकल्याचे समोर आले होते. यामध्ये यातील मृतदेह हा पुर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले होते. याबाबत शिंकापूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आणि पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत होता.
तपासासाठी पोलिसांची दोन तपास पथके तयार करण्यात आली होती. तपास सरु असताना या दोन्ही पथकांनी सुमारे सलग चार दिवस शिकापूर ते चंदननगर, वडगाव शेरी पुणे या भागातील 300 हून अधिक सीसीटीव्हीची तपासणी केली. यात त्यांना एक वॅगनअर कारचा सहभाग असल्याचा संशय आला. हे वाहन वडगाव शेरी परीसरातील असून ही गाडी जाँय कसबे रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे हा वापरत असल्याची माहिती समोर आली.
त्या अनुषंगाने त्याचे कडे चौकशी केली असता 31 मे रोजी त्याचेकडील वॅगनआर कार नंबर एम.एच. १२ सी.के. ३१७७ त्याचा मुलगा अॅग्नेल जॉय कसवे हा घेवून गेल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला ताब्यात घेवून त्याचे कडे चौकशी केली असता त्याने मयत व्यक्तीची बायको सॅन्ड्रा जॉन्सन लोबो आणि मयतची मुलगी विधीसंघर्षीत बालिका यांनी संगणमताने हा गुन्हा केल्याचे सांगितले.
आरोपी अॅग्नेल कसबे याचे मयत जॉन्सन लोबो हीची मुलगी विधीसंघर्षीत बालिका हिचेसोबत प्रेमसंबंध होते, विधीसंघर्षात बालिका ही आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत यांची मुलगी आहे. त्यांच्या या प्रेमसंबंधाला आरोपी आई सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती, परंतु मयत याचा विरोध होता. त्यामुळे आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत जॉन्सन लोबो यांचेत वाद होत होते. वडिलांना कायमचा दूर करणेच्या उद्देशाने वेगवेगळ्या काईम वेब सिरीज पाहून कट रचला आणि आरोपींनी मयत जॉन्सन कॅजीटन लोबो याचा 30 मे रोजी रात्रीचे वेळी त्याचे घरातच डोक्यात वरवंटयाने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला.
त्यानंतर मयत प्रेत घरातच ठेवले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्यासाठी 31 मे रोजी रात्री मयतास वॅगनआर कारमध्ये टाकून सणसवाडी जवळील एचपी पेट्रोल पंपाचे अलीकडे पुणे से अहमदनगर हायवे रोडलगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतचे नाल्यात टाकून त्याचेवर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिल्याचे सांगितले. पत्नीने हत्या केल्या नंतर नातेवाईकांना व शेजारी यांना समजु नये म्हणून त्यांनी मयताचा फोन चालूच ठेवून त्यावरून रोज व्हॉटसअप स्टेटस ठेवणे सुरू केले होते.
मयताच्या पत्नीचा वाढदिवस 4 जून रोजी असल्याने आरोपी अँग्नेल कसबे याने मयताचे मोबाईल वरून पत्नीचे वाढदिवसाचे स्टेटस ठेवले जेर्णेकरून मयत हा जिवंत आहे असे भासावे. अशाप्रकारे त्यांनी गुन्हा लपवून तपास यंत्रणेची तसेच नातेवाईकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा बारकाईने तपास करून गुन्हा उघडकीस आणलेला असून आरोपींना काल अटक केली.
हेही वाचा