ETV Bharat / state

पुणे शहरातील विविध अपघातात 123 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Dec 30, 2020, 5:31 PM IST

वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असते. आपण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर दंड, शिक्षा होऊ शकतेच पण, आपला जीवही जाऊ शकतो. वाहतुकीचे नियांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच वाहन चालविताना नको ते धाडस केल्यामुळे पुणे शहरात जानेवारी ते नोव्हेंबर 2020 साली 123 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

पुणे - वाहन चालविताना नको ते धाडस केल्यास ते एकप्रकारे अपघाताला निमंत्रण देणारे असते. यावर्षी शहरात अशाच वेगवेगळ्या 392 अपघातात 123 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी जानेवारी ते नोव्हेंबर, 2020 या कालावधीतील आहे.

नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्यांची संख्या दिवेंसदिवस वाढत चालली आहे. त्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे वैयक्तिक वाहन प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत भर पडत आहे. अरूंद रस्ते, बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांची मालिका कायम आहे.

या कारणांमुळे होतात अपघात

वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करूनही विनाहेल्मेट दुचाकी चालविले, मोटार चालिवताना सीटबेल्टचा वापर न करणे, सुसाट वाहने चालविणे, सिग्नलवर वाहतूक कर्मचारी न दिसल्यास नियमभंग करणे, डाव्या बाजूने वाहन न चालविणे, अशा कारणांमुळे अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

तरुणाईने द्यावे स्वयंशिस्तीला प्राधान्य

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, वाहन चालविताना तरुणाईने स्वयंशिस्तीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे अपघातांची संख्या निश्चीतच कमी होण्यास मदत होते. वाहतूक विभागाकडून वारंवार जनजागृती करूनही चालकांकडून अमंलबजावणी केली जात नाही. बेशिस्तपणा कमी झाल्यास गंभीर अपघातांसह किरकोळ अपघातही थांबविण्यास मदत होणार आहे.

शहरातंर्गत घडलेले अपघात

अपघाताचे प्रकार सन
20192020
फेटल अपघात186117
गंभीर अपघात345224
किरकोळ अपघात12751
एकूण अपघात658392
एकूण मृत्यूमुखी193123

हेही वाचा - पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय 1 जानेवारीपासून बंद

हेही वाचा - चोरांचा प्रतिकार न करणाऱ्या 'त्या' दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.