ETV Bharat / state

Pune Crime: लहान बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या विवाहित बहिणीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल - विनयभंगाचा गुन्हा दाखल

आजपर्यंत आपण मुलाने मुलीचा, पुरुषाने महिलेचा विनयभंग केल्याचे प्रकार पाहिले आहेत. पण पुण्यात विमानतळ परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका लहान बहिणीने मोठ्या सख्या विवाहित बहिणीवरच अश्लिल चाळे केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी लहान बहिणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

molested her younger sister
लहान बहिणीशी अश्लील चाळे
author img

By

Published : Jan 27, 2023, 11:29 AM IST

Updated : Jan 27, 2023, 7:18 PM IST

पुणे: बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी मोठ्या बहिणीवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात एका 18 वर्षीय तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून 24 वर्षीय मोठ्या बहीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठी बहिणी ही उच्चशिक्षित आहे. तिचे लग्न झालेले आहे.

मोठ्या बहिणीकडून जबरदस्ती : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित २४ वर्षीय महिला आणि १८ वर्षीय तरुणी या दोघी बहिणी आहेत. विमाननगर परिसरात त्यांचे रो-हाऊस आहे. 23 जानेवारी रोजी लहान बहीण घराच्या ड्रॉईंग रूममध्ये झोपली असताना मोठ्या बहिणीने तिचा विनयभंग केला. तथापि, तिने घाईघाईने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तिच्या मोठ्या बहिणीवर तिच्याकडून जबरदस्ती होत असल्याने तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारदार ही सध्या बारावीची विद्यार्थिनी आहे. संशयित आरोपीच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. आरोपी बहीण विवाहित असून ती अजूनही वडिलांसोबत राहते.

अखेर गुन्हा दाखल : पुण्यात एका बहिणीने आपल्या लहान बहिणीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची तक्रार करण्यासाठी पीडित महिला पोलिस ठाण्यात गेल्यावर अधिकारी गोंधळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या बहिणीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 18 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 24 वर्षीय मोठ्या बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाकट्या बहिणीचा तीव्र आक्षेप : मोठ्या बहिणीने घराच्या हॉल मध्ये झोपलेल्या धाकट्या बहिणीच्या अंगावर हात घासत लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. झोपलेल्या धाकट्या बहिणीला सुरुवातीला काय चालले आहे याची कल्पना आली नाही. तिने डोळे उघडले तेव्हा तिला मोठी बहिण अंगावर हात फिरवताना दिसली. त्यानंतर दोघींमध्ये जोरदार वाद झाला. तरीही, मोठ्या बहिणीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पण धाकट्या बहिणीने यावर तीव्र आक्षेप घेतला. पीडित मुलीच्या शरीराला मोठ्या बहिणीने अयोग्यरित्या स्पर्श केला आणि मिठी मारली. या प्रकरामुळे धाकटी बहीण घाबरली आणि मोठी बहिण तिचे ऐकण्यास तयार नसल्याचे पाहून अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली.

हेही वाचा: Sangli Crime : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीशी छेडछाड, मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Last Updated : Jan 27, 2023, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.