पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरमधून 32 परिचारिकांना काढल्यानंतर मंगळवारी मनसेने आंदोलन करत संबंधित ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. सोमवारी 32 परिचारिकांना तडकाफडकी काढले असल्याचे प्रकरण मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी उजेडात आणले होते. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करू असे आश्वासन महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते.
याच्या निषेधार्थ मनसे पुण्याच्या रुपाली पाटील, नगर सेवक सचिन चिखले, रुपेश पटेकर, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ यांनी कोविड सेंटरवर जाऊन संबंधित ठेकेदाराला जाब विचारला. तेव्हा, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल आंदोलन करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. चार दिवसात 32 परिचारिका आणि वार्डबॉय यांचा पगार करू असे ठेकेदाराकडून सांगण्यात आल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - धक्कादायक! आजारी व्यक्तीला गंभीर जखमी करून जिवंत जाळले; तासाभरातच आरोपीला अटक
हेही वाचा - निवडणुका बिहारमध्ये अन् फटका पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना!