ETV Bharat / state

Vasant More : मनसे नेते वसंत तात्यांना अजित दादांची ऑफर, काय होणार पुढे?

मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (MNS leader Vasant More) यांची सध्या पक्षाअंतर्गत घालमेल सुरु आहे. त्यांची ही खदखद अनेकदा त्यांनी बाहेर बोलुन दाखवली. तर आता एका लग्न समारंभात त्यांना राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार (state opposition leader Ajit Dada Pawar) यांनी पक्षात येण्यासाठी ऑफर (offered to join party) दिली असल्याचे बोलले जात आहे.

Vasant More
मनसे नेते वसंत मोरे
author img

By

Published : Dec 5, 2022, 5:00 PM IST

Updated : Dec 5, 2022, 5:47 PM IST

पुणे : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (MNS leader Vasant More) यांना एका लग्न समारंभात राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार (state opposition leader Ajit Dada Pawar) यांनी ऑफर दिली (offered to join party) आहे. वसंत मोरे मनसे मध्ये नाराज आहेत. त्यांची दखल घेतली जात नाही, असे सातत्याने वसंत मोरे समर्थक सांगत असतात. त्यानंतर नुकतेच मनसेच्या शहर व मनसेच्या वतीने येरवडा मध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना भाषण करू दिले नाही .त्यामुळे वसंत मोरे नाराज आहेत. शहरातील काही पदाधिकारी माझी लोकप्रियता, माझं काम याला घाबरून आणि पक्ष संपवण्याच्या दृष्टीने काम करत असून; त्यासाठीच ते मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे.

प्रतिक्रिया देतांना मनसे नेते वसंत मोरे

पुढील दिशा ठरवणार : माझ्या कामाची पद्धत आणि माझं काम बघून विरोधी पक्षातले स्थानिक नेते नाही, तर राज्यस्तरावरचे विरोधी पक्ष अशा सगळ्याच पक्षामधून मला ऑफर आहेत. परंतु मी आजही राजमार्गावर आहे, असं वसंत मोरे यांनी सांगितलेलं आहे. साहेब कोकण दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतर मी भेटून पुढील दिशा ठरवणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

शहरातील पदाधिकारी डावलतात : वसंत मोरे यांना शहर कोर कमिटी सातत्याने डावलत आहे. मध्यंतरी महाबळेश्वरला सुद्धा एक सहल गेली. त्यात सुद्धा वसंत मोरे नव्हते .त्यानंतर तो खाजगी दौरा असल्याचे बोललं गेलं. त्यातून सुद्धा वसंत मोरेची सातत्याने नाराजी आहे. वसंत मोरे हे प्रकाशझोतात आले ते साधारणपणे भोंग्याच्या आंदोलनावर राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका आणि मांडलेले त्यावरचे मत त्यामुळे पक्षाची भूमिका आणि लोकप्रतिनिधी भूमिका वेगळी असू शकत नाही, असं म्हणून त्यावेळी वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून काढण्यात आलं. परंतु त्यानंतर सुद्धा त्यांना झालेल्या सभेमध्ये जाहीर भाषण करण्याची संधी पक्षाने दिली. त्यामुळे वसंत मोरे यांना पक्ष डावलत नाही तर, शहरातील पदाधिकारी डावलत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे.

राज ठाकरेंकडे बाजू मांडणार : त्यानंतरच्या काळात त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली .त्या ठिकाणाहूनही त्यांना आता दूर करण्यात आलेला आहे .तसेच त्यांचे खंदे समर्थक निलेश माझीरे माथाडी सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पक्षही सोडला. साधारणपणे वसंत मोरे यांना अडचणीत आणायचं आणि पक्षाच्या बाहेर जायला भाग पाडायच अशीच रणनीती शहरातील काही नेते करत आहेत. त्यात त्याने शहराचे नेते बाबू वांगस्कर यांचे सुद्धा नाव घेतलेला आहे. की मला जाणून बुजून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु मी राज ठाकरे साहेबांना हे सगळं सांगणार आहे आणि त्यानंतर मी माझा निर्णय घेणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष : पुण्यातील त्यांच्याच मतदारसंघांमध्ये त्यांना भाषण करू दिले जात नाही. त्यांच्या कार्यक्रमाची दिवशी इतर कार्यक्रम ठेवले जातात. माझी भीती त्यांना बसलेली आहे, मी शहर कार्यालयात जात नाही. पण मी पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात जातो, माझी लोकप्रियता त्यांना पाहत नसल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे. आता नेमकं राज ठाकरे या सर्वांवर काय निर्णय घेतात हे पाहणं फार महत्त्वाचा आहे.

राज ठाकरेंचा आदेश मान्य : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौरावर असून; त्यामध्ये त्याने कार्यकर्त्यांना असा आदेश दिला की, जर पक्ष वाढवण्याच्या विरोधात कुणी आला तर, त्याला तुडवां आणि पक्ष वाढवा तुम्हाला सर्व पाठिंबा पक्षाकडून मिळेल त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात सुद्धा वसंत मोरे यांना अडचणी येत आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, ते म्हणाले की, राज साहेब ठाकरे यांनी मला जे आदेश दिले. ते मी करणार असा सुद्धा वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे.

Last Updated : Dec 5, 2022, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.