पुणे - सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जातो का, याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाहणी करणार आहे. त्यासाठी मनसे देखरेख पथक स्थापन करणार असल्याची माहिती मनसे नेते अनिल शिदोरे यांनी दिली.
हेही वाचा - ..हा तर आपल्या आईचा सन्मान.! मराठी भाषेला संपवण्याची कोणाची टाप नाही'
राज्यभर 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी दिनाचे औचित्य साधत राज्यभरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने विधी मंडळात केली. या पार्श्वभूमीवर बोलताना शिदोरे म्हणाले की, मराठी भाषेबाबत कायदे केले जातात. अनेक घोषणाही केल्या जातात मात्र, त्याची अंमलबाजवणी होत नाही. त्यामुळे मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याचे काम मनसे करणार आहे.