ETV Bharat / state

बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक - anil bhosale and three other arrested

बँकेचे संचालक भोसले यांच्यासह एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.

mlc anil bhosale and three other arrested for shivajirao bhosale cooperative bank fraud
बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक
author img

By

Published : Feb 26, 2020, 12:43 AM IST

Updated : Feb 26, 2020, 12:58 AM IST

पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत.

बँकेचे संचालक भोसले यांच्यासह एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण -

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे २०१८-१९ या सालचे ऑडिट करण्यात आले. यात ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले. तेव्हा सनदी लेखापाल योगेश लकडे यांनी याबाबत बॅँकेचे संचालक आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

Last Updated : Feb 26, 2020, 12:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.