ETV Bharat / state

Pune Crime : अश्लील व्हिडिओ कॉल करून आमदारालाच फसविले सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; आरोपीस राजस्थानातून अटक - mla yashwant mane sextortion case

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांना सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात गोवणाऱ्या आरोपीला सायबर पोलीस पुणे यांच्याकडून राजस्थानमधील भरतपूर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीने आमदार माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावरून प्राप्त करून त्यांच्याशी व्हाट्सअपवर संपर्क केला. यानंतर त्यांना सेक्सटॉर्शनच्या प्रकारात अडकविण्याचा प्रयत्न केला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 10, 2023, 8:25 PM IST

सेक्सटॉर्शन प्रकरणावर बोलताना पोलीस आणि आमदार माने

पुणे: शहरांमध्ये वास्तव्यास असलेले मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी या आरोपी विरोध फिर्यादी दिलेली होती. सोशल मीडियावरून माझा नंबर घेऊन, मला अश्लील संदेश पाठविले त्यात रेकॉर्ड केलेला व्हिडिओ कॉल, फेसबुक व्हाट्सअप, वरून सर्वत्र पाठवून तुमची बदनामी करू अशी धमकी देऊन त्यांना 1 लाख रुपयांची मागणी केली. सायबर क्राईमने एका आरोपीला राजस्थानमधून अटक करून मोठी कारवाई केली.

मोबाइलमध्ये आढळले अश्लील व्हिडीओ: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रिजवान असलम खान (वय २४ वर्षे, रा. ग्रामसिंहली महाराज तालुका नगर, जिल्हा भरतपूर, राजस्थान) असे आहे. त्याच्याकडे प्राथमिक तपास केला असता या गुन्ह्यात त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून एकूण चार मोबाईल संचार सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल्समध्ये स्क्रीन रेकॉर्ड केलेले 90 अश्लील व्हिडिओ मिळून आले आहेत. आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे करीत आहेत.

आरोपीला अटक : आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी फिर्याद दिल्यानंतर तपासाचे चक्री गतिमान फिरवून सायबर क्राईम पोलीस ठाण्याची दोन पथके राजस्थानला रवाना करण्यात आली. भरतपूर पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली आहे. आणखी यात कोण कोण सहभागी आहे याचा तपास सुरू आहे, अशी माहिती अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेली आहे.

आमदाराचे आवाहन : अशा प्रकारच्या केसेस भरपूर होत आहेत. परंतु, त्यात समोर येऊन कोणी बोलत नाही. माझी फसवणूक झाली नाही; फक्त प्रयत्न केला गेला. माझ्यासोबत जे घडले ते इतरांसोबतही घटतच असावे. म्हणून मी पुढे येऊन पोलिसांना ही तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करून आरोपीला अटक केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि कुणीही याला बळी पडू नये. यासाठी कुठलाही मोबाईल फोन नंबर व्हिडिओ कॉल उचलून त्यांना कुठलाही रिप्लाय देऊ नका. ते काही करत नाहीत, फक्त धमकी देतात. त्यामुळे सायबर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन आमदार यशवंत माने यांनी केले आहे. पोलिसांकडून सुद्धा अशा कुठल्याही फोन कॉल आला असता त्याला बळी न पडता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा आणि आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

हेही वाचा: Cow Hug Day : 'काऊ हग डे'चे आवाहन अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने घेतले मागे; वाचा कुठे माशी शिंकली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.