ETV Bharat / state

MLA Shivendra Raje : छत्रपती संभाजी महाराजांची धर्मरक्षक म्हणून इतिहासात ओळख, आमदार शिवेंद्रराजे यांचा दावा - MLA Shivendra Raje

छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज रक्षक म्हणावे की, धर्मवीर यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची धर्म रक्षक म्हणून इतिहासात ओळख आहे. त्यामुळे त्यावर चर्चा व्हावी असे मला वाटत नाही. तेव्हा सर्वांनी त्यांना धर्मवीरच म्हणावे असे ते म्हणाले. ते आज पुण्यात आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या आयोजन प्रसंगी बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 22, 2023, 5:42 PM IST

आमदार शिवेंद्रराजे

पुणे - छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक की, धर्मवीर म्हणावे यासाठी चर्चा होत असून यासाठी मोर्चा देखील काढले जात आहे. आत्ता या वादावर आमदार शिवेंद्र राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच इतिहासात आहे. त्यामुळे यावर चर्चा होऊ नये असे माझे मत आहे. तुम्हाला लहान पणी देखील संभाजी महराज हे धर्मवीर आहे असेच शिकवले आहे. मग छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीरच म्हटले पाहिजे असे यावेळी शिवेंद्र राजे म्हणाले.

लव जिहाद यासाठी कडक कायदे - धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद प्रकरणी कठोर कायदे करावेत, या मागण्यांसाठी आज समस्त हिंदू समाजाच्या वतीने हिंदु जन आक्रोश मोर्चाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

हिंदू समाजात भीतीचे वातावरण - हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात शहरात हा मोर्चा होतो आहे. मोर्चातील मागण्याची दखल सरकार नक्की घेईल. केंद्रात मोदींचे सरकार आहे. राज्यात आमचे सरकार आहे त्यामुळे या मोर्चाच्या मागण्यांची दखल नक्की घेण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच - छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये धर्माचे रक्षण करणे हा देखील भाग होता.आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आमच्या धर्माचे रक्षण आम्ही करतो आहे. आत्तापर्यंत आपण जो इतिहास वाचला आहे त्यात छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच आहे. त्यामुळे यावर चर्चा होऊ नये असे माझे मत आहे असे, यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले.

मोर्चात हिंदुत्ववादी संघटना सहभागी - आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, 'तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग या मोर्चात आहे. लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - E-Governance Regional Council : ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.