ETV Bharat / state

...तर तुम्हाला रोज पुण्यात यावं लागेल, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला

अजित पवार यांनी आठवड्यातून एका अधिकाऱ्यांना धाक दाखवू नये तर दररोज पिंपरी-चिंचवड व पुण्यात यावे आणि अधिकाऱ्यांना धाक दाखवून कामे करुन घ्यावीत, असा उपरोधी टोला आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 12, 2020, 5:31 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) - आरडाओरड करून व धाक दाखवल्यानंतर अधिकारी काम करत नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रेमाने त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागते. प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी आहे, तशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे. मात्र, आठवड्यातून एकदा धाक दिल्याने काही होणार नाही. तुम्हाला यासाठी रोजच पुण्यात यावे लागेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. ते पिंपरीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

बोलताना आमदार चंद्रकांत पाटील
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, मित्र या नात्याने अजित पवार यांना म्हणत असतो की, आरडा-ओरडा करून धाक दाखवून काही माणसे (अधिकारी) कामाला लागत नाहीत. प्रेमाने अडचणी समजावून घेऊन काम करून घ्यावे लागते. पण, प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते तशी अजित पवार यांची आहे. याच कार्यपद्धतीने काम सुरू ठेवण्यासाठी अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असायला पाहिजे. सकाळी 7 ते 1 मुंबईत काम करायचे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुण्या काम करायचे अन रात्री दहा वाजता पुन्हा मुंबईला निघायचे, असे करायला हवे. तुमचा धाक आठवड्यातून एकदा येऊन राहणार नाही. रोज येऊन बसायला लागेल, असे पाटील म्हणाले आहेत. नेमके पुण्यातील अधिकाऱ्यांना अजित पवार काय म्हणाले होते?

जम्बो रुग्णालयाबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो रुग्णालयाबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील खाटांच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 11 सप्टें.) दिले होते.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.