बारामती- महाराष्ट्रातील राजकारणात पवार घराण्याला विशेष महत्व आहे. याच घराण्यातील कन्येचा लग्नसोहळा नुकताच पार पाडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सख्ये पुतणे श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला हिचा विवाह सोहळा नुकताच बंगळुरू येथे पार पडला.
बंगळुरुमधील उद्योगपती करण विरवाणी यांच्याशी मिताली हिचा विवाह झाला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. मिथिला पवार आणि करण विरवाणी यांचा विवाह अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवारही आपल्या सख्ख्या पुतणीच्या लग्नाला सपत्नीक हजर होते.
या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या सोहळ्यातील काही फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आनंदी तर दिसत आहेतच पण त्यासोबतच ते भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवार यांचं कुटुंब मोठं आहे. कुठल्याही सणवार किंवा कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंबीय जेव्हा एकत्र भेटतं, तेव्हा आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.