ETV Bharat / state

पूरस्थितीला पश्चिम घाटातील पाण्याचे चुकीचे नियोजन जबाबदार - माधव गाडगीळ - केरळाताल पूरस्थितीचे कारण

महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये सध्या पुराने हाहाकार माजवला आहे. या परिस्थितीला केवळ अतिवृष्टी  जबाबदार नसून धरणातून पाणी सोडण्याचे चुकीचे नियोजन आणि नदीपात्रामध्ये होत असलेले अनधिकृत बांधकाम कारणीभूत असल्याचे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.

पूरपरिस्थितीला पाण्याचे चुकीचे नियोजन जबाबदार - ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ
author img

By

Published : Aug 14, 2019, 11:16 PM IST

पुणे - महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये सध्या पुराने हाहाकार माजवला आहे. या परिस्थितीला केवळ अतिवृष्टी जबाबदार नसून धरणातून पाणी सोडण्याचे चुकीचे नियोजन आणि नदीपात्रामध्ये होत असलेले अनधिकृत बांधकाम कारणीभूत असल्याचे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.

पश्चिम घाटातील धरणे पूर्ण भरल्यानंतर त्यातून एकाच वेळी पाणी सोडल्याने केरळमध्ये पूर आल्याचा आरोप गाडगीळ यांनी केला आहे. याबाबत रिव्हर रिसर्च सेंटर या अभ्यासकांच्या ग्रुपने तसेच तिथल्या स्थानिक पंचायतींनी सरकारला जुलैपासूनच धरणांतून पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. मात्र तसे झाले नाही. धरण पूर्ण भरल्यानंतर एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले, असेही त्यांनी सांगितले.

गाडगीळ म्हणाले, पाण्याचे चुकीचे नियेजन या सर्व परिस्थितीसाठी कारणीभूत आहे. पश्चिम घाट परिसरातील जमिनीचा अत्यंत अयोग्य पद्धतीने वापर केला जातोय. या भागात असलेल्या नद्यांच्या परिसरात बिल्डर लॉबी सक्रिय आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली जात आहेत. ही बिल्डर लॉबी सरकारी यंत्रणांना हाताशी धरते. सरकारी यंत्रणा फक्त संबंधित यंत्रणांना क्लीनचिट देण्याचे काम करत आहे. अनधिकृत खोदकाम, बांधकामाला अधिकृत करण्याचे काम सरकारी यंत्रणा करत आहे.

पश्चिम घाट समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक गोष्टी सुचवल्या आहेत. मात्र, त्यावर विचार होत नाही आणि पूर आल्यानंतर सरकारी यंत्रणा जाग्या होतात अशी खंतही गाडगीळ यांनी व्यक्त केली.

Intro:माधव गाडगीळ, पर्यावरण तज्ञBody:mh_pun_03_madhav_gadgil_on_flood_english_byte_avb_7201348

anchor
महाराष्ट्र केरळ कर्नाटक या परिसरामध्ये सध्या पुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला केवळ अतिपाऊस हेच कारण नसून धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन चुकल्याने तसेच नदीपात्रामध्ये होत असलेले अनधिकृत बांधकाम तहसीलदार परिसरामध्ये केली जाणारी अनधिकृत खोदकाम कारणीभूत असल्याचे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे केरळ मध्ये आलेला पूर याला पश्चिम घाट परिसरात असलेली अनेक धरणं आणि त्यातून एकाच वेळेस सोडले गेलेले पाणी कारणीभूत असल्याचं घाडगे म्हणाले केरळमध्ये पश्चिम घाट परिसरात असलेली ही धरणं पूर्ण भरू दिली जातात आणि त्यातून एकाच वेळेस पाणी सोडलं जातं याबाबत रिव्हर रिसर्च सेंटर या अभ्यासकांच्या ग्रुपने तसेच तिथल्या स्थानिक पंचायतींनी सरकारला जुलै पासूनच धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती मात्र तसे झाले नाही आणि धरण पूर्ण भरल्यानंतर एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले पाण्याचे मीच मॅनेजमेंट याला कारणीभूत आहे सर्वच पश्चिम घाट परिसरात जमिनीचा अत्यंत अयोग्य पद्धतीने वापर केला जातोय या परिसरात जेसीबी च्या माध्यमातून मोठे उत्खननात उत्खनन केले गेले त्यामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे पूर हा एक भाग झाला मात्र इतरही अनेक बाबी या पोराला कारणीभूत आहेत पश्चिम घाट भागात असलेल्या नद्यांच्या परिसरात बिल्डर लॉबी सक्रिय आहे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली जात आहेत ही बिल्डर लॉबी सरकारी यंत्रणांना हाताशी धरते सरकारी यंत्रणा फक्त संबंधित यंत्रणांना क्लीनचिट देण्याचेच काम करते आहे जे अनधिकृत बांधकाम खोदकाम पश्चिम घाट परिसरात होते त्याला अधिकृत करण्याचे काम सरकारी यंत्रणा करते आहे त्यामुळे अशा चुकीच्या या कामांना सरकारकडुन अभय मिळत असल्या चे ते म्हणाले पश्चिम घाट समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक गोष्टी सुचवल्या आहेत पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन स्थानिक यंत्रणांना मॅनेजमेंट बाबत माहिती देण्यात यावी यासारख्या अनेक गोष्टी आम्ही सुचवल्या मात्र त्यावर विचारच होत नाही आणि मग अशा परिस्थितीत पूर आल्यानंतर सरकारी यंत्रणा जाग्या होतात असे गाडगीळ म्हणाले

Byte माधव गाडगीळ, पर्यावरण तज्ञConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.