ETV Bharat / state

Pune Crime : दिवाळीत मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी मंदिरातील दानपेटीवर मारला डल्ला - Minors Stole Donation Box

हडपसर येथील फुरसुंगी (looting Fursungi Mahadev temple theft) येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मौजेसाठी तसेच दिवाळीनिमित्त खरेदीसाठी तीन विधीसंघर्षग्रस्त मुलांनी हडपसर येथील फुरसुंगी ग्रामदैवत येथील शंभु महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी फोडून (Temple donation box theft) त्यातील रक्कम लंपास (donation box amount looted) केली.

Minors Stole Donation Box
Minors Stole Donation Box
author img

By

Published : Oct 23, 2022, 6:55 PM IST

पुणे : हडपसर येथील फुरसुंगी (looting Fursungi Mahadev temple theft) येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मौजेसाठी तसेच दिवाळीनिमित्त खरेदीसाठी तीन विधीसंघर्षग्रस्त मुलांनी हडपसर येथील फुरसुंगी ग्रामदैवत येथील शंभु महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी फोडून (Temple donation box theft) त्यातील रक्कम लंपास (donation box amount looted) केली. या घटनेनंतर काही तासांमध्येच त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. (Latest News from Pune), (Pune Crime)

मंदिरात चोरी करणारे अल्पवयीन आरोपी सीसीटीव्हीत कैद

मंदिरामध्ये चोरीचे केले नियोजन- मंदिरात चोरी झाल्यानंतर पोलिसांकडून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये तीन मुले दानपेटी उचलून बाजूला घेऊन जात असताना दिसले. तपास पथकाने सीसीटीव्हीचा माग काढून त्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावरुन माहिती मिळाली की, ही तिन्ही मुले एम. जी. रोड पुणे येथील आहेत. या तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. रेकॉर्डवरील विधीसंघर्षग्रस्त मुलगा तसेच त्याचे इतर दोन साथीदार यांनी मिळून या मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी हडपसर गावठाण राममंदिराजवळील युनिकॉर्न एम.एच.१२ जी.सी. १७२७ हि गाडी चोरुन त्या गाडीचा वापर चोरी करण्यासाठी केला. चोरी करुन झाल्यानंतर पुन्हा चौरी केलेली मोटर सायकल त्याठिकाणी पार्क केली. मंदिरात चोरी करण्यापूर्वी तिघांनी शंभू महादेव मंदिरामध्ये जाऊन त्याठिकाणचे मंदिराचे सर्व परिसराचे फोटो काढले. मंदिरांचे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता तसेच बाहेर जाण्यासाठी रस्ता पाहिला व त्याठिकाणी कोणत्या वेळेला पुजारी येतात व भाविक येतात याचा पूर्ण अभ्यास करुन मंदिरामध्ये चोरी करण्याचे नियोजन केले.

स्टॅच्यूत ठेवली चोरलेली रक्कम- आरोपींनी मंदिरातील दानपेटी फोडली. त्यामधील रक्कम त्यांना उचलता न आल्याने त्यांनी त्यामधील काही रक्कम त्याच ठिकाणी सोडलेली होती. विशेष म्हणजे, त्यांनी मिळालेली रक्कम ही लोकसेवा हनुमान मंदिर येथील जवळील गार्डनमधील कचरा टाकण्याचे डस्टबीनच्या स्टॅच्युमध्ये पोत्यात लपवून ठेवलेली होती. सर्व दक्षिणा रक्कमपैकी २२, २५०/- रुपये जप्त करण्यात आलेले आहे.

कुख्यात गुन्हेगाराचे फोटो काढले छातीवर- तिघांनी मिळून फॅशन स्ट्रीट कॅम्प पुणे येथे हौस मौजमजेसाठी व नशा करण्यासाठी दानपेटीमधील रक्कम खर्च केलेली आहे. तसेच यावेळी हे तिघे सराईत गुन्हेगार राहुलसिंग भोंड याच्या फोटोचा टॅटू छातीवर / हातावर काढीत असताना तिन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेवर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.