ETV Bharat / state

बारामतीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी गजाआड

बारामतीतल अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडितेला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली आहे.

physical abuse in baramati
बारामतीतल अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
author img

By

Published : Jan 28, 2020, 9:09 AM IST

Updated : Jan 28, 2020, 10:46 AM IST

पुणे - बारामतीतील अंजनगाव येथे अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. यानंतर तिच्याशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी महादेव भिकाराम परकाळे (वय-45) याच्या विरोधात विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी 12 वर्षांची असून यासंबंधी अधिक माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे.

यानुसार, 23 जानेवारीला पीडित मुलगी तिच्या बहिणीसोबत शाळेत जात असताना आरोपी देखील दुचाकीवरून त्याच रस्त्याने निघाला. यानंतर त्याने पीडितेसह तिच्या बहिणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले; आणि लैंगिक चाळे केले. तसेच याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. पीडिता घाबरलेल्या अवस्थेत दिसल्याने आईने विचारपूस केली. यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

या प्रकरणावर गावात पडदा टाकण्यात आला होता. परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पीडितेच्या वडीलांनी हा प्रश्न उपस्थित केला. यानंतर गावातील अन्य मुलींशीही अशा प्रकार घडू शकतो, यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली.

Intro:Body:अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे
बारामती तालुक्यातील अंजनगावातील धक्कादायक प्रकार
आरोपीला पोलिसांकडून अटक...

बारामती

बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्या प्रकरणी पोलिसांना एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले. शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून. तिच्याशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी महादेव भिकाराम परकाळे ( वय 45, रा. अंजनगाव, ता. बारामती) यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच बाल  लैगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी 12 वर्षांची आहे. दि. 23 जानेवारी रोजी ती व तिची चुलत बहिण दोघी शाळेत जात असताना आरोपी दुचाकीवरुन शाळेकडे निघाला होता. त्याने पिडीतेसह तिच्या दुसऱ्या चुलत बहिणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.  आणि हात मागे घेत पिडीतेशी लैंगिक चाळे केले. संशयीत आरोपीने नातूला शाळेत सोडल्यानंतर तिला दुचाकीवर पुढे बसवत तिच्याशी चाळे सुरुच ठेवले. विद्यालयाजवळ तिला सोडताना तु रोज माझ्या गाडीवर यायचं, तसेच घडल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नको. अशी धमकी पिडीतेला दिली. तिची आई घरी आल्यानंतर पिडीता घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे तिने तिची विचारपूस केली असता पिडीतेने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. दरम्यान, या प्रकरणावर गावात पडदा टाकण्यात आला होता. परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पिडीतेच्या वडीलांनी हा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित केला. त्यानंतर गावातील अन्य मुलीशीही अशा प्रकारचा दुर्व्यवहार होवू शकतो. हे लक्षात घेत फिर्याद दाखल करण्यात आली.Conclusion:
Last Updated : Jan 28, 2020, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.