पुणे - राज्य नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, सर्व काही सुरू होईल, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मात्र, असे केल्यास हा निर्णय धाडसाचे ठरेल किंवा कोणताही विचार न करता केलेले विधान असू शकते, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी करण्यात आली होती. पण, आता अर्थचक्र सुरू करण्यासाठी आता अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशातच राज्य नोव्हेंबरपर्यंत संपूर्णपणे अनलॉक होईल, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेले हे विधान आशादायी ठरेल किंवा हे विचार न करता केलेले विधान ठरेल, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. तसेच तज्ज्ञांच्यामते पुन्हा एकदा कोरोनाची लाट येणार आहे. आपण यापूर्वीही कोरोनाचे प्रमाण कमी होत ते अचानक पुन्हा वाढले आहे. दिवाळीत नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येणार आहेत. म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनलॉकबाबत केलेले विधान हे कोणताही विचार न केलेले आहे, असे भोंडवे म्हणाले.
हेही वाचा - पुणे-सातारा महामार्गावर धावत्या ट्रकने घेतला पेट, पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत