ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यातील १६ कारखान्यांचे २५ लाख टन गाळप पूर्ण - साखर कारखान्यांचा हंगाम सुरु

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरु होऊन महिना होत आहे. जिल्ह्यातील १० सहकारी आणि ६ खाजगी कारखान्यांपुढे १४० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १६ कारखान्यांची जवळपास २५ लाख टन गाळप पूर्ण केले आहे. साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखान्याने जिल्ह्यात प्रथम आणि गाळपात बारामती अ‌ॅग्रो प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Milling of 25 lakh tonnes of 16 factories
साखर कारखान्यांचा हंगाम सुरु
author img

By

Published : Nov 27, 2020, 8:52 PM IST

बारामती - जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन महिना होत आहे. जिल्ह्यातील १० सहकारी आणि ६ खासगी कारखान्यांपुढे १४० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १६ कारखान्यांची जवळपास २५ लाख टन गाळप पूर्ण केले आहे. मात्र गेल्या आठ दहा दिवसांपासून थंडी गायब झाल्याने साखर उताऱ्यात मात्र दीड टक्के घट झाली आहे. साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखान्याने जिल्ह्यात प्रथम आणि गाळपात बारामती अ‌ॅग्रो प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती, विघ्नहर, निरा भीमा, पराग अ‌ॅग्रो, श्रीनाथ म्हसकोबा या कारखान्यांनी दीड लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सतावत आहे. काही कारखान्यावर ऊसतोडणी मजुरांची संख्या कमी आहे. त्यामुळे बैलगाडीतून ऊसाची वाहतूक कमी होत आहे. कमी टोळ्या आल्याने कारखान्याकडून हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी सुरू आहे. ऊसतोडणी मजुरांना पर्याय देण्यासाठी कारखाने स्थानिक शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशिन उपलब्ध करून देत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान कारखानदारीवर अवलंबून असल्याने एकरकमी एफआरपी देण्याची मागणी सभासद शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे महिना होवूनही कारखानदारांकडून निर्णय होत नसल्याने चालू हंगामाच्या एफआरपीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

एफआरपीबाबत कारखान्यांकडून मौन

गत हंगामातील अंतिम भावाचा विषय संपला असला तरीही चालू हंगामातील एफआरपीबाबत कारखानदारांकडून कोणतीही भूमिका जाहीर होत नाही. गाळप हंगाम सुरू होवून जवळपास एक महिना होत आहे. एकरकमी रक्कम द्यायची का ८०- २०चा फॉर्म्युला वापरायचा यावर कारखानदारांच्यात खल सुरू आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांचे ऊस गाळप व साखर उतारा (आकडेवारी २५ नोव्हेंबर)

१) सोमेश्वर १६५७२० १०. १३.

२) माळेगाव १७५५३४ १०. ०५

३) छत्रपती १६२८३३ ९ . ३८

४) घोडगंगा १२९००० १०. १०

५) विघ्नहर १७८०४० ९. ६३

६) भीमाशंकर ६४६४० ९. ५८

७) संत तुकाराम ८९६९० ९. २३

८) दौंड शुगर २२४६८५ ८. ९८

९) श्री.म्हस्कोबा १६८३६६ ९. १८

१०) बारामती ॲग्रो ३५८८८० ८. ५०

११) व्यंकटेश्वरकृपा १३९८८० १०. ०५

१२) अनुराज शुगर १२१६७० ९. ५०

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.