ETV Bharat / state

वादग्रस्त पोस्टप्रकरणी मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल - Pune Latest News

समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुक वरून समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याने, एकबोटे यांच्या विरोधात कोंढवा परिसरात राहणाऱ्या शाहाफाजील मोईनुददीन सिध्दीकी यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद एकबोटे
मिलिंद एकबोटे
author img

By

Published : Mar 6, 2021, 11:34 PM IST

पुणे - समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुक वरून समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याने, एकबोटे यांच्या विरोधात कोंढवा परिसरात राहणाऱ्या शाहाफाजील मोईनुददीन सिध्दीकी यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा भागात महापालिकेने हज हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला त्याला विरोध करत एकबोटे यांनी ही पोस्ट टाकली होती.

काय आहे ही फेसबुक पोस्ट

'कोढव्यामध्ये हज हाउसच्या निर्मिदतीचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. ते अतिशय आश्चर्यकारक व धक्कादायक आहे, कोंढवा हे मिनी पाकीस्तान आहे, या ठिकाणी अतिरेक्यांचा स्लिपर सेल आहे, केंद्रीय गुप्तचर खात्याचा तसा अहवाल आहे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात येईल असा अतिशय घाणेरडा निर्णय महापालीकेने घेतला आहे. महापालीकेने जनतेच्या विकासासाठी जे पैसे खर्च होणे अपेक्षीत आहेत, ते पैसे हज हाउसच्या बांधकामासाठी महापालिका खर्च करत आहेत. हज हाऊससाठी महापालिच्या वतीने 4 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. सांस्कृतीक केंद्राच्या नावाखाली हज हाउसचे बांधकाम करण्याची पळवाट आयुक्तांनी शोधुन काढलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे की, प्रशासनाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही धार्मीक स्थळाचे बांधकाम करण्यात येणार नाही, परंतु सांस्कृतीक केंद्र म्हणून हज हाऊसला परवानगी देण्यात आली आहे. हा न्यायालयाचा अपमान आहे. समस्त हिंदू आघाडी आपली ताकत पणाला लावेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की, समस्त हिंदू आघाडी काही झाल तरी महानगरपालीका प्रशासनाचा हज हाउसचा मनसुबा यशस्वी होवू देणार नाही. असं मिलिंद एकबोटे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे'.

एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान या पोस्टवरून आता मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहाफाजील मोईनुददीन सिध्दीकी यांनी याबाबत तक्रार दिली होती. एकबोटे यांनी पोस्टच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. ते कोंढवा हे मिनी पाकिस्तान असल्याचे म्हणत आहेत. तसेच कोढव्यात अतिरेक्यांचा स्लिपर सेल असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे, यामुळे कोंढव्याकडे पाहाण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असं सिद्धीकी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. अखेर एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.