पुणे : पुण्यात म्हाडाकडून नव्या वर्षात तब्बल ५ हजार ९८० घरांची सोडत काढली जाणार ( Mhada Lottery of 5 Thousand 980 Houses ) आहे. विशेष म्हणजे ही सोडत संगणक प्रणालीनुसार काढण्यात येणार ( Online Registration Process ) आहे. या सोडतीमुळे पुण्यात घर घेण्याचे अनेक सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
म्हाडाकडून नोंदणी प्रक्रिया : म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांची सोडत होणार आहे. यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी ( Complete Transparency In Registration Process ) लागेल. नोंदणी प्रक्रिया आज ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर ४ फेब्रुवारीपर्यंत नागरिक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. म्हाडाच्या विविध योजनेतील २ हजार ५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २ हजार ९९० सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत ३९६ सदनिका अशा एकूण ५ हजार ९१५ सदनिकांसाठी सोडत असेल तर यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २ हजार ९२५ घरे उपलब्ध आहेत.
संगणक प्रणाली नोंदणी प्रक्रिया : यंदाची ही सोडत आयएलएमएस २.० या संगणक प्रणालीच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. या पूर्वी केवळ ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा होती. त्यानंतर विजेत्यांची प्रतीक्षा यादी जाहीर होत असे. तसेच कागदपत्रांची पूर्तता, छाननी आदी प्रक्रिया पार पाडली जात होती. आता नवीन आयएलएमएस २.० प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया अर्ज भरण्यावेळीच घरबसल्या पूर्ण करावी लागणार आहे.
कागदपत्रे सादर करणे आवश्यक : म्हाडाने घरांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करून ती सातवर आणली आहे. अर्ज करतेवेळी ही सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या अर्जांची छाननीसुद्धा ऑनलाइन पद्धतीने होईल. या सात कागदपत्रांमध्ये तहसीलदारांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांना अधिवास प्रमाणपत्र वेळेत मिळावे व यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची विनंती करणार आहे.अस यावेळी म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
मुंबईकरांना घरे : 5 जानेवारीला सोडत निघणार आहे. अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, म्हाडाच्या मुंबई शाखेत एक वेळ नोंदणी केली ( Mhada Registration details ) जाईल. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अपेक्षित आहे. ज्यामुळे ते गृहनिर्माण लॉटरी योजनेसाठी पात्र ठरतील. विजेत्यांना लगेच घराचा ताबा मिळेल.लॉटरीसाठी अर्ज करताना, अर्जदाराला पॅनकार्ड, आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा सादर करावा लागेल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) अर्जदारांना त्यांचे जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल. लॉटरी विजेत्याला म्हाडाकडून सूचना पत्र प्राप्त होईल. पूर्ण रक्कम भरल्यानंतर 24 तासांत त्यांना ताबा मिळेल. नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन असली तरी विजेत्यांना घराच्या चाव्या घेण्यासाठी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हाडा कार्यालयात जावे लागेल.