बारामती : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत (Beating student by robbing money) त्यास दुचाकीवरून ऊसाच्या शेतात नेत नग्न करून चित्रीकरण (filming student naked) करण्यात आले. त्यानंतर त्याला एटीएम सेंटरमध्ये नेत त्याच्या खात्यातून दोन ट्रान्झेक्शनद्वारे १४५०० रुपये काढल्याचा (withdrawing money from student account) प्रकार बारामतीत घडला. (Latest news from Pune) याप्रकरणी तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.
असा घडला घटनाक्रम : याबाबत संबंधित विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा विद्यार्थी हा सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृहात राहत आहे. दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली. अधिक माहिती अशी की, रविवारी हा विद्यार्थी सुभद्रा माॅल येथे खरेदी करून शासकीय महाविद्यालयाकडे निघाला होता. ऑक्सिजन प्लांट्च्या पूर्वेकडील भिंतीजवळ तो आला असताना एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने त्याला शिविगाळ, दमदाटी करत त्याच्या पॅंन्टच्या खिशातील १५ हजार रुपये मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतले. त्यावेळी फिर्यादीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तु माझे पैसे का घेतले अशी विचारणा केली. यावेळी आणखी एका दुचाकीवरून दोघे आले. ते अगोदर तेथे आलेल्या इसमाशी बोलले. तु याला पैसे माघारी दे असे कसे म्हणू शकतो,असे म्हणत त्या तिघांनी या विद्यार्थ्याला शिविगाळ, मारहाण केली. त्यातील एकाने जबरदस्तीने दुचाकीवर मध्यभागी त्याला बसवले. त्याच्या पाठीमागे एकजण बसला.
एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडले : त्यांनी ही दुचाकी गोरड हाॅस्पिटलच्या पाठीमागील बाजूच्या ऊसाच्या पिकाजवळ नेली. तेथे पैसे परत मागतो काय, असे म्हणत या विद्यार्थ्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यात आले. शेतातील ऊसाने त्याला मारहाण करण्यात आली. मांडीवर व उजव्या हाताच्या अंगठ्यावर मारहाण झाली. यात अंगठा फ्रॅक्चर झाला. दोन्ही हातावर नखाने ओरखडण्यात आले. नग्नावस्थेतील त्याचे फोटो काढून घेण्यात आले. त्यानंतर तु आम्हाला आणखी पैसे दे नाही तर तुझे नग्न फोटो सगळीकडे व्हायरल करू अशी धमकी त्यांनी दिली. त्याला पुन्हा कपडे घालून दुचाकीवरून बसवण्यात आले. रात्री साडेआठच्या सुमारास त्याला आयसीआयसीच्या एटीएम सेंटरमध्ये नेण्यात आले. दमदाटी करत त्याच्याकडून पिन क्रमांक विचारून घेत सुरुवातीला १० हजार व त्यानंतर ४५०० रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. त्याला तेथेच सोडून ते एमएच-४२, एएल- ६३६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.