ETV Bharat / state

विशेष : पिंपरी-चिंचवडमध्ये नवरात्रौत्सवात उपवासाच्या मावा जिलेबीची धूम - PCMC special news

सध्या सर्वत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साध्यापद्धतीने साजरा केला जात आहे. उपवासासाठी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. पण, सध्या शहरात मावा जिलेबी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

जिलेबी घेताना
जिलेबी घेताना
author img

By

Published : Oct 18, 2020, 8:46 AM IST

Updated : Oct 18, 2020, 10:55 AM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू असून शहरातील मावा जिलेबी खवय्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही जिलेबी उपवासाठी विशेष बनवली जाते तसेच इतर व्यक्ती देखील खाऊ शकतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभात जलपान गृह दुकानावर जिलेबी प्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, याचे दर साधारण जिलेबीपेक्षाही जास्त असतात. शनिवारपासून (दि. 17 ऑक्टोबर) नवरात्रौत्सव सुरू झाल्याने जिलेबीची मागणी वाढली आहे.

बोलताना दुकानदार व ग्राहक

मध्यप्रदेश आणि मुंबईमध्ये भेटणारी मावा जिलेबी आता पुण्यात म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरात मिळणार असल्याने खाद्य प्रेमी खुश आहेत. एरवी साधी जिलेबी खाऊन कंटाळलेल्या ग्राहकांना मावा जिलेबी खुश करते आहे. अवघ्या देशात नवरात्रौत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. कोरोनामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे देखील अनेक जण टाळत आहेत. परंतु, उपवासाची मावा जिलेबी खाण्यासाठी नागरिक उत्सुक असल्याचे दिसत आहे.

तूप आणि शुद्ध मावा या जिलेबीत वापरला जातो. अशी जिलेबी महाराष्ट्रात विशेष म्हणजे पुण्यात मिळावी अशी इच्छा ग्राहकांना होती असे दुकानदार ठाकूर यांनी सांगितले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात आता जिलेबी मिळत आहे. बहुतांश महाराष्ट्रात कुठे ही अशी जिलेबी मिळत नसल्याने जिलेबी प्रेमींना चव चाखता येत नाही. मात्र, शहरातील दुकांनवर अनेक जण गर्दी करत असून या जिलेबीचा आस्वाद घेत आहेत. यावेळी जिलेबी प्रेमी म्हणतात की, अशी जिलेबी मुंबई आणि मध्यप्रदेश इथेच मिळते. पण, शहरात देखील आता मिळत असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. मावा जिलेबीसाठी साध्या जिलेबी पेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतात. मात्र, तरीही आवडीने ही जिलेबी खात असल्याचे खाद्यप्रेमींचे म्हणणे आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवड शहरातून महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक, कर्नाटकच्या दोघांचा समावेश

Last Updated : Oct 18, 2020, 10:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.