ETV Bharat / state

अविवाहित प्रियकराने केले लग्न, विवाहित प्रेयसीने पती आणि दिराच्या मदतीने काढला काटा

प्रियकराने लग्न केल्याचा राग मनात धरून विवाहित प्रेयसीने नवरा,दीर व नवऱ्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या घडवली. ही घटना 3 एप्रिलला घडली असून 27 एप्रिलला उघडकीस आली आहे.

पोलीस
पोलीस
author img

By

Published : Apr 29, 2021, 8:30 PM IST

Updated : May 5, 2021, 3:38 PM IST

पुणे - राजगुरूनगर येथे राहणाऱ्या प्रियकराने लग्न केले म्हणून, आव्हाट (ता. खेड) येथील विवाहित प्रेयसीने, तिच्या पतीच्या आणि दिराच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याची घटना 3 एप्रिलला घडली आणि 27 एप्रिलला उघडकीस आली. महेश वसंत लोहकरे (वय 26 वर्षे, रा. समतानगर, राजगुरुनगर, मुळ रा. पोखरकरवाडी ता. आंबोगाव), असे मृताचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

महिलेशी अनैतिक संबंध

खेडचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश आंबेगाव तालुक्यातील पोखरकरवाडी येथील होता. तो कामानिमित्त येथील समतानगर परिसरात राहत होता. महेश 3 एप्रिलपासून गायब असल्याची तक्रार त्याच्या आईने 6 एप्रिलला खेड पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत तपास करत असताना महेशचे पुष्पा भरत ढोंगे या महिलेशी अनैतिक संबंध होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे त्या दिशेने फिरवली. पुष्पा ही मागील चार वर्षांपासून पती भरत ढोंगे व मुलांना सोडून प्रियकर महेशसोबत राहत होती, असे पोलीस तपासात समोर आले.

पोलीस
पोलीस

महेशने केले दुसरे लग्न

दरम्यान, महेशने दुसरे लग्न केले. याचा राग मनात धरुन पुष्पाने महेशला राहत्या खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर पती भरतला बोलावून घेतले. त्या दोघांनी महेशचा काटा काढायचा ठरवले. यासाठी भरतने आपला भाऊ भगवान व मित्र दिनेश तारू या दोघांनाही कटात सामील करुन घेतले. चौघांनी मिळून पुष्पाच्या खोलीत महेशला लोखंडी राॅडने मारहाण केली. त्यानंतर महेशला मोटारसायकलवर बसवून जबरदस्तीने कारकुडी (ता. खेड) येथील जंगलात नेले. तेथे षुष्पाच्या ओढणीने त्याच्या गळ्याला बांधून झाडाला लटकावून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोटरसायकलवरून गोहे खुर्द गावाच्या शिवारात जाळण्याचा प्रयत्न केला. नंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह खड्डा करुन पुरला.

मृतदेह काढला खोदून

या गुन्ह्याच्या तपासात संशयित भरत ढोंगे याला अटक केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पुष्पा, तिचा नवरा भरत, दीर भगवान आणि नवर्‍याचा मित्र दिनेश तारु यास चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. संशयित आरोपीने दाखवलेल्या जागेवर पंचनामा करुन, पोलिसांनी मृतदेह खोदून काढला. खूप दिवस झाल्याने फक्त सापळा मिळून आला. न्यायालयाने आरोपींना 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - खेडमध्ये बाधितांपेक्षा कोरोनामुक्‍तांची संख्या अधिक

Last Updated : May 5, 2021, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.