ETV Bharat / state

लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात

'मुळशी पॅटर्न', 'देऊळ बंद' यांसारख्या यशस्वी सिनेमांचे लेखक, दिग्दर्शक आणि 'रेगे', 'फर्जंद' यांसारख्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेते प्रविण तरडे यांच्या कारला रात्री 11 वाजता सासवडजवळ अपघात झाला. यावेळी अभिनेते रमेश परदेशी, विशाल चांदणे त्यांच्या सोबत होते.

लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात
author img

By

Published : Aug 28, 2019, 3:13 AM IST

पुणे - 'मुळशी पॅटर्न', 'देऊळ बंद' यांसारख्या यशस्वी सिनेमांचे लेखक, दिग्दर्शक आणि 'रेगे', 'फर्जंद' यांसारख्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेते प्रविण तरडे यांच्या कारला रात्री 11 वाजता सासवडजवळ अपघात झाला. यावेळी अभिनेते रमेश परदेशी, विशाल चांदणे त्यांच्या सोबत होते.

marathi actor pravin tarades car collided with tree in saswad
लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात

सासवड जवळील हिवरे गावातून येत असताना महादेव मंदिराजवळ एका अवघड वळणावर गाडीने रस्ता सोडला. ब्रेक दाबून गाडी कशीबशी कंट्रोल केली. मात्र ती बाजूच्या झाडाला धडकली. ही घटना घडली तेव्हा अभिनेते रमेश परदेशी गाडी चालवत होते. प्रवीण तरडे त्यांच्या शेजारी बसले होते, तर कार्यकारी निर्माते विशाल चांदणे हे मागील सीटवर बसले होते. फक्त नशीब बलवत्तर आणि गाडीला एअर बॅग्स असल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

दरम्यान, सासवड पोलिसांनी घटनास्थळी पोहचत अपघाताची नोंद केली आहे. अपघातानंतर प्रविण तरडे, रमेश परदेशी आणि विशाल चांदणे हे रात्री उशिरा पुण्यात पोहोचले आहेत. याबाबत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तरडे यांनी केले आहे.

Intro:'मुळशी पॅटर्न', 'देऊळ बंद' यासारख्या यशस्वी सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि 'रेगे', 'फर्जंद' यासारख्या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेते, प्रविण विठ्ठल तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या गाडीला काल रात्री 11 वाजता सासवड जवळ अपघात झाला. फक्त नशीब बलवत्तर आणि गाडीला एअर बॅग्स असल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

सासवड जवळील हिवरे गावातुन येत असताना महादेव मंदिरापाशी एक अवघड वळण रस्ता आला. गाडी वळली पण तिने रस्ता सोडला, ब्रेक दाबून गाडी कशीबशी कंट्रोल केली. मात्र ती बाजूच्या झाडावर धडकली, नाहीतर खाली पडली असती. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा अभिनेते रमेश परदेशी गाडी चालवत होते, प्रवीण तरडे पुढे त्यांच्या शेजारी बसले होते. तर कार्यकारी निर्माते विशाल चांदणे हे मागे बसले होते.

गाडी बीएमडब्ल्यू असल्याने तिला सुरक्षेच्या दृष्टीने चार एअर बॅग्स असतात. त्यामुळे गाडी झाडावर आदळूनही सर्वजण सुखरूप राहिले. कुणालाही कोणतीही छोटीशी जखमही झालेली नाही.

दरम्यान सासवड पोलीसानी घटनास्थळी पोहचून अपघाताची नोंद केली आहे. प्रविण तरडे, रमेश परदेशी आणि विशाल चांदणे हे रात्री उशिरा पुण्यात पोचले आहेत. याबाबत कुणीही काहीही अफवा पसरवल्यास त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन तरडे यांनी केलं आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.