ETV Bharat / state

Maratha Reservation Row : मराठा आंदोलनाचा कृषीमंत्री धनंजय मुंडेंना फटका ? ; पुण्यातील कार्यक्रमाकडं फिरवली पाठ, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात - Maratha reservation

Maratha Reservation Row : पुण्यात आयोजित एका कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहिले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं ते गैरहजर राहिल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय.

Maratha Reservation Row
Maratha Reservation Row
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 7:58 AM IST

तुषार काकडे, नेते, मराठा क्रांती मोर्चा शिवसंग्राम

पुणे Maratha Reservation Row : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना सुद्धा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका बसल्याचं चित्र पुण्यात पाहायला मिळालंय. शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पुणे शहर पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे होते. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका धनंजय मुंडेंना सुद्धा बसल्याचं चित्र दिसलं. कार्यक्रम स्थळी अगोदरच काही आंदोलक आल्याची कुणकुण पोलिसांना लागली आणि पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं.

राज्य शासनासाचा निषेध : मराठा समन्वयक समिती तसंच शिवसंग्राम पक्षाचे नेते तुषार काकडे हे कार्यक्रमात जाऊन बसले होते. पोलिसांना शंका येताच पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देत, आमचा मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्यात एवढा गंभीर प्रश्न असताना, आम्ही निषेध करण्यसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमाला आलो होतो. परंतु, अगोदरच पोलिसांनी मला बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं.

जवळच्या मोठ्या व्यक्तींचं निधन झाल्यानं कार्यक्रमाला गैरहजेरी : मात्र हा सगळा प्रकार सुरू असतानाच काही वेळातच धनंजय मुंडे यांनी मेसेज करत मी कार्यक्रमाला येऊ शकत नसल्याचं सांगितलं. जवळच्या मोठ्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळं मी कार्यक्रमाला येऊ शकत नसल्याचा मेसेज संयोजकांना देण्यात आला. परंतु, मराठा आंदोलनाचा फटका सर्वच मंत्र्यांना बसत आहे. तसाच फटका कृषिमंत्र्यांना सुद्धा बसू नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच धनंजय मुंडे यांनी कार्यक्रमाला येण्याचं टाळलं अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु होती.

हेही वाचा :

  1. Yuva Sangharsh Yatra Postponed : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी 'युवा संघर्ष यात्रा' तूर्तास स्थगित
  2. Sharad Pawar On Maratha Reservation : आश्वासनं पाळता येत नसतील तर देऊ नये; मराठा आरक्षणावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
  3. Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री शिंदेंना घरचा आहेर, ठाणे जिल्हा प्रमुख म्हणाले ....'असे' मराठा मुख्यमंत्री नकोच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.